शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

एअरटेलनंतर आता जिओचा स्टारलिंकसोबत करार; खरोखरच इंटरनेट प्लॅन परवडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:15 IST

Jio-Starlink News: एअरटेल आणि जिओसोबतच्या या भागीदारीला अद्याप सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. यानंतरच भारतात स्टारलिंकची सेवा सुरु होऊ शकणार आहे. 

अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला आता भारतात हातपाय पसरण्यास मोठी मदत मिळणार आहे. एअरटेलनंतर आता रिलायन्स जिओने देखील स्टारलिंक या सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरसोबत करार केला आहे. गेल्या काही वर्षांपासून स्टारलिंक भारतात येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होती. परंतू, भारत सरकारने त्यांना परवानगी दिली नव्हती. आता त्यांचे मार्ग मोकळे झाले आहेत. 

एअरटेल आणि जिओसोबतच्या या भागीदारीला अद्याप सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. यानंतरच भारतात स्टारलिंकची सेवा सुरु होऊ शकणार आहे. 

रिलायन्स स्टारलिंकचे इंटरनेट वापरणार नाहीय, तर स्टारलिंकची डिव्हाईस, हार्डवेअर आणि इन्स्टॉलेशनमध्ये मदत केली जाणार आहे. यासाठी ग्राहक जिओच्या प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकणार आहेत. हे सर्व रिटेल आणि ऑनलाईन स्टोअर्सवर उपलब्ध केले जाणार आहे. थोडक्यात जिओ स्टारलिंकला ही सेवा पुरविणार आहे. 

मंगळवारीच एअरटेलनेही स्पेसएक्स सोबत करार केला होता. ज्या भागात वायरलेस इंटरनेट किंवा वायर इंटरनेट उपलब्ध नाही, तिथे स्टारलिंकची सेवा वापरता येणार आहे. या भागात जिओ आणि एअरटेल इतर सर्व प्रक्रिया पार पाडणार आहे. 

खरोखरच परवडणार का?स्टारलिंकची ही इंटरनेट सेवा भारतीयांना खरोखरच परवडणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एअरटेल फायबरचे प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरु होतात, त्यावर जीएसटी पकडला तर महिन्याला ५८८ रुपये मोजावे लागतात. तर जिओच्या फायबरचे प्लॅन हे ७०० रुपयांपासून सुरु होतात. या दोन्हींचा स्पीड हा ५० आणि ३० एमबीपीएस एवढा आहे. मग स्टारलिंक किती पैसे घेईल असाही प्रश्न भारतीयांना पडला आहे. हे पाहता स्टारलिंकची सेवा दुर्गम भागातल्या लोकांना परवडणारी असेल असे वाटत नाही. 

 

टॅग्स :Jioजिओelon muskएलन रीव्ह मस्कAirtelएअरटेल