लहान मुलांनी बघू नये Porn, त्यासाठी फोनमध्ये आजच बदला हे सेटींग्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:23 PM2022-11-30T14:23:09+5:302022-11-30T14:23:36+5:30

आजकालच्या गरजेनुसार, आई-वडील मुलांच्या हातात फोन देतात. पण भीती कायम राहते की, ते असं काही बघू नये जे त्यांच्यासाठी चांगलं नाहीये. अनेक रिपोर्टमधून हे समोर आलं आहे की, लहान मुलांमध्ये पॉर्नची सवय फार लवकर लागते.

Adult content on phone how to block porn and other adult site on smartphone to avoid children to watch it | लहान मुलांनी बघू नये Porn, त्यासाठी फोनमध्ये आजच बदला हे सेटींग्स...

लहान मुलांनी बघू नये Porn, त्यासाठी फोनमध्ये आजच बदला हे सेटींग्स...

googlenewsNext

एकीकडे इंटरनेटची दुनिया वेगाने वाढत आहे. तेच दुसरीकडे यामुळे धोका आणि गैरप्रकारही वाढत चालले आहेत. लहान मुलांच्या हाती मोबाइल आल्याने त्यांच्यापर्यंत पॉर्न सहजपणे पोहोचत आहे. त्यामुळे ते चुकीच्या मार्गाने जाण्याचा धोकाही वाढला आहे. अशीच एक घटना मंगळवारी हैद्राबादमधून समोर आली आहे. इथे पॉर्न बघण्याची सवय असलेल्या पाच मुलांना त्यांच्यासोबत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर रेप करण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, हे सगळे आरोपी मुले शाळेनंतर नेहमीच कॉलनीमध्ये फिरत होते आणि आपल्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ बघत होते. आरोपींपैकी चार मुलांवर बलात्काराचा आरोप आहे. तर पाचव्या मुलावर बलात्काराचा व्हिडीओ काढण्याचा आरोप आहे. तसेच तो सोशल मीडियावर शेअर करण्याचा आरोप आहे.

आजकालच्या गरजेनुसार, आई-वडील मुलांच्या हातात फोन देतात. पण भीती कायम राहते की, ते असं काही बघू नये जे त्यांच्यासाठी चांगलं नाहीये. अनेक रिपोर्टमधून हे समोर आलं आहे की, लहान मुलांमध्ये पॉर्नची सवय फार लवकर लागते. ज्यामुळे त्यांच्या बुद्धीवर वाईट परिणाम होतो.
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फोनमधील काही असे सेटींग्स सांगणार आहोत, जे ऑन करून आई-वडील अॅडल्ट कंटेंट रोखू शकतात.

पहिली पद्धत - Google Play रिस्ट्रिक्शन

लहान मुलांसाठी सेफ करण्यासाठी आणि अॅडल्ट कंटेंटपासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी सगळ्यात आधी एंड्रॉइडच्या गूगल प्ले रिस्ट्रिक्शनला ऑन करा. त्यामुळे लहान मुले अॅप, गेम आणि इतर वेबसाइट्स डाऊनलोड करू शकणार नाहीत. जे त्यांच्या वयासाठी उपयुक्त नाहीत.

1) यासाठी सगळ्यात आधी लहान मुलांच्या डिवाइसवर गुगल प्ले स्टोरमध्ये जा.

2) त्यानंतर लेफ्ट कॉर्नरमधील सेटींगमध्ये जा.

3) यात तुम्हाला  ‘Parental controls’ चा ऑप्शन मिळेल.

4) यावर टॅप केल्यावर तुम्हाला पिन सेट करण्यासाठी सांगितलं जाईल. पिन सेट केल्यावर आई-वडील पेरेन्टल कंट्रोल सेटींग चेंज करू शकता.

5) एकदा पिन सेट झाल्यावर प्रत्येक कॅटेगरीसाठी स्टोर बेस्ड वयानुसार रेटींगच्या आधारावर रोख लावू शकता. पण काळजी ही घ्या की, पिन तुमच्या मुलांना सांगू नका.

दुसरी पद्धत - Chrome वर ऑन करा सेफ सर्च

अनुपयोगी कंटेंट ब्लॉक करण्यासाठी अॅंड्रॉयडवर गुगल सेफ सर्च फीटर ऑन करा. हे निश्चित करण्यासाठी चांगलं आहे की, जेव्हा मुले  Google Chrome अॅपचा वापर करून वेब ब्राउज़ करतात तेव्हा चुकून त्यांच्या गोष्टींवर पोहोचू शकत नाही. ज्यासाठी ते तयार नसतात.

तिसरी पद्धत

प्ले स्टोरवर अनेक Parental अॅप्स आहेत ज्यांचा वापर तुम्ही मुलांचा फोन सेफ करण्यासाठी करू शकता.
 

Web Title: Adult content on phone how to block porn and other adult site on smartphone to avoid children to watch it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.