आधार कार्ड हे भारत सरकारकडून दिले जाणारे एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र आहे. आधार कार्डाचा उपयोग अनेक सरकारी आणि खाजगी सेवांमध्ये ओळख प्रमाणपत्र म्हणून केला जातो. शाळा प्रवेश, सरकारी योजना, पासपोर्ट, बँक किंवा अनेक गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी आधार अनिवार्य आहे. मोठ्या व्यक्तींसाठी जितके आधार कार्ड गरजेचे आहे, तितकेच लहान मुलांसाठीही आधार कार्ड गरजेचे आहे. त्यामुळे लहान मुलांचे आधारकार्ड कसे काढायचे, हे जाणून घेणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे.
बाळाच्या जन्मानंतर आधार कार्ड काढल्याने अनेक सरकारी योजनांमध्ये मुलाला लाभ मिळवता येतो. तसेच, भविष्यकाळात विविध सेवांमध्ये या कार्डाचा उपयोग ओळखपत्र म्हणून होतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सहज आणि सोपी आहे. लहान मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी बाळाचे जन्म प्रमाणपत्र, रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड आणि आई वडिलांचे आधारकार्डची गरज लागते.
लहान मुलांचे आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया
- सर्वात प्रथम यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- पुढे'बूक अॅन अपॉईंट' या पर्यायावर आधी क्लिक करा.
- त्यानतंर त्या ठिकाणी शहर किंवा केंद्र निवडा.
- मग बाळाचे नाव, जन्मतारीख आणि पालकांची माहिती भरावी आणि अपॉईंटमेन्ट बूक करा.
- नंतर आपल्याला वेळ आणि तारीख दिली जाईल. दिलेल्या वेळेनुसार, आधार केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
- जर बाळाचे ५ वर्ष पूर्ण झाले असतील तर, बायोमेट्रीक्स प्रोसेस पूर्ण करा.
- १४ ते २१ दिवसांत पोस्टाने किंवा ईमेलद्वारे आपल्याला ई आधार मिळेल.
आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच त्याची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत तुमचा आधार कार्ड नंबर आणि बायोमेट्रिक माहिती कोणालाही देऊ नका. कारण यामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीला धोका होऊ शकतो.