मोठा Aadhaar! कोणतीही समस्या असल्यास 'या' नंबरवर फोन करा; UIDAI ची हेल्पलाईन जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 08:06 PM2021-02-05T20:06:50+5:302021-02-05T20:07:47+5:30

Aadhaar helpline number : अनेकांचे आधार कार्ड हरविणे, मोबाईल नंबर लिंक नसणे, पत्ता चुकीचा, नाव- जन्मतारीख चुकीची असे एका अनेक समस्या असतात. यासाठी त्यांना पोस्ट ऑफिस आणि आधार केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत होते. आता UIDAI ने टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकच जारी करून मोठा त्रास वाचविला आहे. 

Aadhaar helpline number is 1947, UIDAI twitted; 12 languages including Marathi | मोठा Aadhaar! कोणतीही समस्या असल्यास 'या' नंबरवर फोन करा; UIDAI ची हेल्पलाईन जारी

मोठा Aadhaar! कोणतीही समस्या असल्यास 'या' नंबरवर फोन करा; UIDAI ची हेल्पलाईन जारी

googlenewsNext

सरकारी कामांपासून ते खासगी कामांसाठी देखील आता आधार क्रमांकाची गरज पडू लागली आहे. मात्र, अनेकांचे आधार कार्ड हरविणे, मोबाईल नंबर लिंक नसणे, पत्ता चुकीचा, नाव- जन्मतारीख चुकीची असे एका अनेक समस्या असतात. यासाठी त्यांना पोस्ट ऑफिस आणि आधार केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत होते. आता UIDAI ने टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकच जारी करून मोठा त्रास वाचविला आहे. 


आधार प्रणाली राबविणाऱ्या UIDAI ने हेल्‍पलाइन क्रमांक 1947 (Aadhaar helpline 1947) सुरु केला आहे. या क्रमांकावर 12 वेगवेगळ्या भाषांमधून संपर्क साधता येणार आहे. या नंबरवर फोन केल्यानंतर आधार कार्डशी संबंधित कोणत्याही समस्येचा उत्तर मिळू शकणार आहे. थोडक्यात युआयडीएआयने कस्टमर केअर सारखे कॉल सेंटर सुरु केले आहे. UIDAI ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. 
या नंबरवर मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगु, कन्नड, तामिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू भाषांमध्ये सेवा देण्यात येत आहे. 

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) ऑक्टोबर २०१९ मध्ये आधार कार्डचं नवं प्रिटींग सुरू केलं आणि आधार पीव्हीसी कार्ड हे नवं कार्ड बाजारात आणलं. 


आधार पीव्हीसी कार्डचा आकार हा बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डसारखा आहे. त्यामुळे ते तुम्ही पाकिटात सहजपणे ठेवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही घरबसल्या तुमच्या एकाच मोबाइल क्रमांकावरुन संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी आधारकार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता. या पीव्हीसी आधारकार्डासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये शुल्क द्यावे लागेल. 


Aadhaar: कागदी आधारकार्ड फाटलेय? असे मागवा पीवीसी कार्ड, ते ही अधिकृत

पीव्हीसी आधार कार्डचे फायदे
>> पीव्हीसी कार्डची गुणवत्ता चांगली असल्यानं ते दीर्घकाळ टीकेल आणि पाकिटातही सहजपणे ठेवता येतं. 
>> पीव्हीसी कार्डमध्ये लॅमिनेशन केलं जात असल्यानं छापील माहिती देखील सुरक्षित राहते. 
>> आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्टसारखे सिक्यूरिटी फिचर्स देखील असतात. 
>> पीव्हीसी आधार कार्डद्वारे तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून तातडीने ऑफलाइन व्हेरिफिकेशन करता येतं. 
 

Web Title: Aadhaar helpline number is 1947, UIDAI twitted; 12 languages including Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.