परवडणाऱ्या किंमतीत नवा मोटोरोला स्मार्टफोन; 6GB RAM असलेला दणकट Moto G52 भारतात लाँच
By सिद्धेश जाधव | Updated: April 25, 2022 14:58 IST2022-04-25T14:58:04+5:302022-04-25T14:58:13+5:30
हा फोन 50MP कॅमेरा, 6GB RAM, Snapdragon 680 चिपसेट आणि 30W 5,000mAh बॅटरीसह भारतात लाँच झाला आहे.

परवडणाऱ्या किंमतीत नवा मोटोरोला स्मार्टफोन; 6GB RAM असलेला दणकट Moto G52 भारतात लाँच
Motorola नं ठरल्याप्रमाणे आपला नवीन स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. जागतिक बाजारात आलेल्या Moto G52 ची देशात एंट्री झाली आहे. हा फोन 50MP कॅमेरा, 6GB RAM, Snapdragon 680 चिपसेट आणि 30W 5,000mAh बॅटरीसह भारतात लाँच झाला आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून विकत घेतल्यास तुम्हाला डिस्काउंट देखील देण्यात येईल.
Moto G52 ची किंमत
Moto G52 स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम व 64 जीबी मेमरी असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. तसेच 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेल 16,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा हँडसेट 3 मेपासून फ्लिपकार्टसह रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. फाटक फ्लिपकार्टवर लाँच ऑफर अंतगर्त 1000 रुपयांची सूट मिळेल.
Moto G52 चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोला मोटो जी52 स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात आयपी52 रेटिंग मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
मोटोरोला मोटो जी52 स्मार्टफोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ही पंच-होल ओएलईडी स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा डिवाइस अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित माययूएक्सवर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 6 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.