सॅमसंगसाठी बॅड न्यूज! 61 Samsung Phones च्या विक्रीवर बॅन; जाणून घ्या कारण
By सिद्धेश जाधव | Updated: October 25, 2021 16:46 IST2021-10-25T16:46:01+5:302021-10-25T16:46:05+5:30
61 Samsung Galaxy Smartphones Banned In Russia: Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 या दोन स्मार्टफोन्ससह एकूण 61 Samsung Galaxy Smartphones वर रशियाने बंदी घातली आहे.

सॅमसंगसाठी बॅड न्यूज! 61 Samsung Phones च्या विक्रीवर बॅन; जाणून घ्या कारण
दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने काही दिवसांपूर्वी आपली प्रीमियम Galaxy Z सीरिज सादर केली होती. कंपनीने या सीरिज अंतर्गत Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 असे दोन फोल्डेबल स्मार्टफोन सादर केले आहेत. या दोन्ही फोन्सचे जगभरातून कौतुक होत आहे. परंतु या दोन स्मार्टफोन्ससह एकूण 61 Samsung Galaxy Smartphones वर रशियाने बंदी घातली आहे. रशियातील न्यायालायने सॅमसंगच्या 61 मोबाईल फोनच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण
सॅमसंग स्मार्टफोनवरील ही बंदी पेटंटचे उल्लंघन केल्यामुळे घालण्यात आली आहे. सॅमसंग पे ही कंपनीची एनएफसी आधारित पेमेंट सेवा आहे. परंतु सेवेमागील टेक्नॉलॉजीचे पेटंट रशियन कंपनी SQWIN SA असे कोर्टात सिद्ध झाले आहे. त्यामुळे दक्षिण कोरियन कंपनीच्या 61 स्मार्टफोन्सच्या आयातीवर आणि विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे सॅमसंग पे रशियातील तिसऱ्या क्रमकांची पेमेंट सेवा आहे.
सॅमसंग पे ची घोषणा 2015 मध्ये करण्यात आली होती, त्यांनतर एक वर्षाने ही सेवा अस्तित्वात आली. परंतु विक्टर गुलचेंको या रशियन व्यक्तीने 2013 मध्ये अशाच एका इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचे एक पेटंट फाईल केले होते. एप्रिल 2019 मध्ये त्याची नोंदणी करण्यात आली आणि SQWIN SA त्या पेटंटचा ताबा घेतला. सॅमसंगच्या सर्वच नव्या स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा असल्यामुळे हा बॅन कंपनीचे खूप मोठे नुकसान करू शकतो.