Realme ची कमाल ऑफर, मोठ्या डिस्काउंटसह 6000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:36 AM2022-06-28T10:36:33+5:302022-06-28T10:38:02+5:30

6000mAh बॅटरी असलेला Realme C25s स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे.  

6000mah battery phone Realme C25s available with huge discount  | Realme ची कमाल ऑफर, मोठ्या डिस्काउंटसह 6000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन 

Realme ची कमाल ऑफर, मोठ्या डिस्काउंटसह 6000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन 

Next

बजेटमध्ये मोठी बॅटरी देणारे स्मार्टफोन खूप कमी आहेत. त्यात Realme C25s चा समावेश आहे कारण या हँडसेटमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. आता या राक्षसी बॅटरी असलेल्या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया ही ऑफर.  

फोनचा 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेलवर 1 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंटदिला जात आहे. त्यामुळे 11,999 रुपयांचा हा व्हेरिएंट तुम्ही फक्त 10,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला प्रीपेड ऑर्डर द्यावी लागेल. म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायची निवड न केल्यास हा डिस्काउंट मिळणार नाही.  

Realme C25s चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स  

रियलमी सी25एस मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, फोन 4 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम 128 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे.  

रियलमी सी25एस मध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस क्वाड-कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल प्राइमरी, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक-अँड-वाइट कॅमेरा आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी UI 2.0 स्किनसह येतो. 

Web Title: 6000mah battery phone Realme C25s available with huge discount 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.