शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

5G च्या तयारीला लागा! मोदी सरकारच्या जिओ, एअरटेल, व्हीआयला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 13:39 IST

एअरटेल की जिओ ५जी सेवा पहिल्यांदा सुरु करणार अशी स्पर्धा रंगलेली असताना आता व्हीआयने देखील तयारी पूर्ण केल्याचे  वृत्त आले आहे. व्हीआयने पुण्यात 5G च्या चाचण्या घेतल्या आहेत.

सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरना ५जी स्पेक्ट्रमची असाईनमेंट लेटर दिली आहेत. याचबरोबर ५जी लाँचिंगची तयारी करण्यास सांगितले आहे. यामुळे पुढील काही दिवसांत ५जी सेवा लाँच होण्याची शक्यता वाढली आहे. 

5G smartphone Guide: 5G येण्याआधी स्मार्टफोन घ्यायचाय? हे आहेत बेस्ट ऑप्शन, किंमतही १० हजारांपासून सुरुएअरटेल की जिओ ५जी सेवा पहिल्यांदा सुरु करणार अशी स्पर्धा रंगलेली असताना आता व्हीआयने देखील तयारी पूर्ण केल्याचे  वृत्त आले आहे. व्हीआयने पुण्यात 5G च्या चाचण्या घेतल्या आहेत. यामुळे लवकरच व्होडाफोनही भारतात फाईव्ह जी लाँच करेल असे दिसत आहे. व्होडाफोनने ही सेवा कधीपर्यंत लाँच केली जाईल याची अधिकृत माहिती दिलेली नाहीय. मात्र, टेलिकॉम इंडस्ट्रीतील सुत्रांनुसार कंपनी याच महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्येच 5G सर्विस लाँच करण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरुवातीला अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या १३ शहरांत केली जाणार आहे.  

5G Expense: 5G येताच एकरकमी 15 हजारांचा खर्च करावा लागणार; समोर आली महत्वाची माहितीएअरटेलदेखील ऑगस्टच्या अखेरीस ५जी सेवा सुरु करण्याची तयारी करत आहे. एअरटेल कंपनीने लिलावात 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये 19867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते.  तर रिलायन्स जिओदेखील 5G सेवा सुरु करण्याची तयारी करत आहे. यामुळे एकामागोमाग एक अशा तीन कंपन्या देशभरात ५जी सेवा लाँच करणार आहेत. 

बाजारात १० हजार रुपयांपासून फाईव्ह जी रेडी फोन मिळत आहेत. परंतू, ते सगळ्याच ठिकाणी चालतील असे कोणतीच कंपनी ठोस सांगू शकत नाही. कारण प्रत्येक कंपनीने वेगवेगळे स्पेक्ट्रम आणि बँडविड्थ विकत घेतल्या आहेत. ग्रामीण भागात, निमशहरी आणि महानगरांमध्ये या वेगवेगळ्या स्पेक्ट्रमवर कंपन्या फाईव्ह जी सेवा देणार आहेत. यामुळे किती बँडचा मोबाईल घ्यावा, यावर सारे गणित ठरणार आहे.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोन