इंटेक्स अ‍ॅक्वा नोटचा ५.५ स्मार्टफोन बाजारात दाखल

By शेखर पाटील | Updated: September 5, 2017 17:56 IST2017-09-05T17:54:23+5:302017-09-05T17:56:20+5:30

इंटेक्स कंपनीने फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा अ‍ॅक्वा नोट ५.५ हा स्मार्टफोन ५७९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे.

5.5 Intex Aqua Note launched in the smartphone market | इंटेक्स अ‍ॅक्वा नोटचा ५.५ स्मार्टफोन बाजारात दाखल

इंटेक्स अ‍ॅक्वा नोटचा ५.५ स्मार्टफोन बाजारात दाखल

ठळक मुद्देहा स्मार्टफोन ड्युअल एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने सज्ज असेल.सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इंटेक्स कंपनीने फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा अ‍ॅक्वा नोट ५.५ हा स्मार्टफोन ५७९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे.

इंटेक्स अ‍ॅक्वा नोट ५.५ हा स्मार्टफोन ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्युअल एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने सज्ज असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असेल. इंटेक्स अ‍ॅक्वा नोट ५.५ हा स्मार्टफोन २८०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सहा तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

इंटेक्स अ‍ॅक्वा नोट ५.५ हा स्मार्टफोन ५.५ इंच आकारमानाच्या आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेच्या कॅमेर्‍याने सज्ज आहे. यात १.२५ गेगाहर्टझ क्वॉड कोअर मीडियाटेक एमटी ६७३७ हा प्रोसेसर आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. 

Web Title: 5.5 Intex Aqua Note launched in the smartphone market