शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

१६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज जिओनी एक्स१एस

By शेखर पाटील | Published: September 20, 2017 8:51 PM

जिओनी कंपनीने तब्बल मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज असणारा जिओनी एक्स१एस हा स्मार्टफोन १२,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत सादर केला आहे.

मुंबई, दि. 20 - जिओनी कंपनीने तब्बल मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज असणारा जिओनी एक्स१एस हा स्मार्टफोन १२,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत सादर केला आहे.

जिओनी एक्स१एस हा स्मार्टफोन २१ सप्टेबरपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. जिओनीने गेल्या महिन्यातच जिओनी एक्स१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला होता. प्रस्तुत मॉडेल याचीच सुधारित आवृत्ती आहे. हा स्मार्टफोन खरेदी करणार्‍या ग्राहकाला एयरटेल कंपनी सहा महिन्यांची वैधता असणारा १० जीबी डाटा मोफत देणार आहे. अर्थात यासाठी एक जीबीचे रिचार्ज करावे लागेल. याशिवाय पेटीएमनेही कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. शीर्षकात नमूद केल्यानुसार यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यात ब्युटिफाईड व्हिडीओ आणि फेस ब्युटी २.० हे फिचर्स देण्यात आले आहेत. तर यातील मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. 

जिओनी एक्स १ एस या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल.  मीडियाटेक एमटी६७३७टी या प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलमध्ये तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येईल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड प्रणालीच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर जिओनी कंपनीचा अमिगो ४.० हा युजर इंटरफेस असेल. तर या मॉडेलमध्ये तब्बल ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Mobileमोबाइल