शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या; सुसाइड नोटवर लिहिले ‘Sorry Mummy’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 12:42 IST

Boy spends Rs 40000 on game kills self: मध्यप्रदेशमधील छतरपुर इथल्या एका 13 वर्षीय मुलाने Free Fire गेममध्ये 40,000 रुपये गमावले आणि त्यामुळे भीती आणि नैराश्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली.

भारतातील लहान मुलं आणि तरुण ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात अडकत आहेत. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्स यामुळे हा विळखा अधिकाधिक घट्ट होत असल्याचे दिसत आहे. या ऑनलाईन गेम्सच्या नादात भांडण, खून आणि आत्महत्या झाल्याच्या बातम्या येत असतात. अशीच एक बातमी मध्यप्रदेशमधून आली आहे. मध्यप्रदेशमधील छतरपुर इथल्या एका 13 वर्षीय मुलाने Free Fire गेममध्ये 40,000 रुपये गमावले आणि त्यामुळे भीती आणि नैराश्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये Sorry Mummy लिहून आपल्या आईची माफी मागितली आहे.  (Class 6 student dies by suicide after losing Rs. 40,000 in online game)

मध्यप्रदेशमधील छतरपुर शहरातील कृष्णा पाण्डेय या मुलाने आत्महत्या केली आहे. कृष्णा 13 वर्षाचा होता आणि तो सहावीत शिकत होता. ऑनलाईन मोबाईल गेम Garena Free Fire मध्ये 40,000 रुपये गमावल्यानंतर कृष्णाने आत्महत्या केली आहे. फ्री फायर गेममधील टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याने हे पैसे खर्च केले होते. कृष्णाचे वडील एक पॅथॉलॉजी लॅब चालवतात तर आई जिल्हापरिषदेच्या दवाखान्यात काम करते.  

काही दिवसांपूर्वी कृष्णाच्या आईला बँकेच्या खात्यातून 1,500 रुपये कट झाल्याचा मेसेज आला होता. याची विचारणा केल्यावर कृष्णाने आपण ओनलाईन गेमसाठी पैसे काढल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची आई त्याला ओरडली म्हणून तो आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद करून घेतला. बराच काळ दरवाजा न उघडल्यामुळे त्याच्या बहिणीने आई-वडिलांना बोलवले आणि त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला.खोलीत कृष्णाचे शरीर फासावर लटकल्याचे आढळले. कृष्णाने ओढणी पंख्याला बांधून फास लावून घेतला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलिसांनी येऊन तपासाला सुरुवात केली.  

सुसाईड नोटमध्ये लिहिले ‘I am Sorry Mummy’  

आत्महत्या करण्यापूर्वी कृष्णाने सुसाइड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्याने आपण कुठे आणि किती पैसे खर्च केल्याची माहिती दिली होती. आपल्याला नैराश्य आल्याची कबुली कृष्णाने या सुसाईड नोटमध्ये दिली होती. 13 वर्षीय कृष्णाने लिहिले आहे कि त्याने ऑनलाइन मोबाईल गेम Garena Free Fire मध्ये 40,000 रुपये खर्च केले होते. गेममध्ये पैसे गमवल्यामुळे तो डिप्रेशनमध्ये आहे आणि म्हणून तो आत्महत्या करत आहे. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषेत लिहिलेल्या या नोटमध्ये त्याने आपल्या पालकांची माफी मागितली असून रडू नका असे म्हटले आहे. कृष्णाने आपला सुसाइड नोटची सुरवातच ‘I am Sorry Mummy’ ने केली आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMadhya Pradeshमध्य प्रदेश