शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

Common Passwords Easily Hacked : सर्वात लवकर हॅक होतात 'हे' 10 पासवर्ड; चुकूनही वापरू नका, नाहीतर रिकामे होईल अकाऊंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 17:39 IST

Common Passwords Easily Hacked : अनेक इंटरनेट युजर्स असे पासवर्ड खूप वेळा वापरतात. ज्याद्वारे हॅकर्स युजर्संच्या डेटापर्यंत सहज पोहोचतात, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली : आजकाल इंटरनेटच्या या युगात लोकांना जास्त पासवर्ड वापरावे लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कोणताही सामान्य पासवर्ड ठेवला, तर तो हॅक होण्याची शक्यता देखील जास्त आहे. जेव्हाही तुम्ही पासवर्ड तयार करता तेव्हा सुपरहिरोसारख्या नावांसह पासवर्ड कधीही तयार करू नका, असे मोझिला फाउंडेशनच्या (Mozilla Foundation) एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे. 

याचबरोबर, या रिपोर्टमध्ये अशाप्रकारे पासवर्ड तयार न बनवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनेक इंटरनेट युजर्स असे पासवर्ड खूप वेळा वापरतात. ज्याद्वारे हॅकर्स युजर्संच्या डेटापर्यंत सहज पोहोचतात, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Haveibeenpwned.com च्या आकडेवारीच्या आधारावर केलेल्या स्टडीनुसार, असे समजते की सुपरहीरो नाव असलेले पासवर्ड सर्वात हॅक केलेल्या अकाउंट्सपैकी एक आहेत. त्यामुळे असे पासवर्ड वापरणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याचबरोबर, असेही म्हटले गेले आहे की, पहिले नाव, जन्मतारीख किंवा 12345 आणि azerty सारखे शब्द सर्वात जास्त पासवर्ड म्हणून वापरले जातात. हॅकर्ससाठी ही नावे सर्वाधिक पॉप्युलर आहेत.

सर्वात जास्त हॅक होणारे 10 पासवर्ड...–Superman–Batman–Spider-Man–Wolverine–Iron Man–Wonder Woman–Daredevil–Thor–Black Widow–Black Panther

वर दिलेल्या शब्दांसारखे पासवर्ड सर्वात जास्त हॅक केले जातात. त्याचबरोबर James Howlett/Logan, Clark Kent, Bruce Wayne आणि Peter Parker पासवर्डही पटकन हॅक होतात. कोणत्याही परिस्थितीत, पासवर्ड जितका गुंतागुंतीचा असेल तितका तो हॅक करणे अधिक कठीण आहे. यामध्ये संख्या आणि अक्षरे मिसळणे खूप कठीण होते.

यासह, NordPass च्या वार्षिक रिपोर्टमध्ये वर्ष 2020 मध्ये सर्वाधिक वापरलेले पासवर्ड उघड झाले आहेत. NordPass ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2020 मध्ये 123456 हा सर्वात सामान्य पासवर्ड होता आणि तो 23 दशलक्ष लोकांनी वापरला होता.123456 च्या नंतर 123456789 हा दुसरा सर्वात सामान्य पासवर्ड होता. तर picture1 हा तिसरा सामान्य पासवर्ड होता. 

NordPass ने या आठवड्याच्या सुरुवातीला आपला रिपोर्ट जाहीर केला. ज्यात सुमारे 200 सामान्य पासवर्डबाबत खुलासा केला होता. त्यात म्हटले आहे की, काही पासवर्ड क्रॅक होण्यास 3 वर्षे लागतात आणि काही पासवर्ड क्रॅक होण्यास 1 सेकंदापेक्षा कमी लागतो.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान