जागतिक टेबल टेनिस : जी. साथियान उपउपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 02:37 AM2019-11-30T02:37:11+5:302019-11-30T02:37:30+5:30

भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी. साथियान याने आपल्यापेक्षा जास्त रॅँंिकंगच्या सिमोन गाऊजीला पराभूत करीत जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

World Table Tennis: G Saathiyan in the prequrterfine Round | जागतिक टेबल टेनिस : जी. साथियान उपउपांत्यपूर्व फेरीत

जागतिक टेबल टेनिस : जी. साथियान उपउपांत्यपूर्व फेरीत

Next

चेंगडू : भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी. साथियान याने आपल्यापेक्षा जास्त रॅँंिकंगच्या सिमोन गाऊजीला पराभूत करीत जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

जागतिक क्रमवारीत ३० व्या स्थानी असलेल्या साथियान याने २२व्या क्रमांकावरील फ्रान्सच्या गाऊजीला ४-३ असे पराभूत केले. त्यानंतर त्याने २४व्या क्रमांकावरील ग्रोथ जोनाथन याला ४-२ असे पराभूत केले. साथियान याने ‘ड’ गटात चार गुण मिळवीत अग्रस्थान पटकाविले. त्यामुळे त्याने अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

त्याचा आज, शनिवारी सामना जर्मनीच्या टिमो बोल याच्याशी होणार आहे. साथियानने गाऊजीला ११-१३, ९-११, ११-८, १४-१२, ७-११, ११-५, ११-८ असे पराभूत केले, तर जोनाथनला ११-३, १२-१०, ७-११, १६-१४, ८-११, ११-८ असे पराभूत केले.

साथियान म्हणाला, ‘माझ्याकडे शब्दच नाहीत. मी प्रथमच गाऊजीवर मात केली आहे. यापूर्वी दोनवेळा त्याच्याकडून मला पराभव पत्करावा लागला होता. माझे प्रशिक्षक मला नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला.’

Web Title: World Table Tennis: G Saathiyan in the prequrterfine Round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.