चंद्रकांत ढेंगळे यांचा झेडपीकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:43+5:302021-07-14T04:25:43+5:30

ढेंगळी यांनी ‘माझे गाव माझे कुटुंब’ ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणून जवळगाव येथे ३५ कोरोना बाधितांना मदत केली, तसेच ...

ZP honors Chandrakant Dhengale | चंद्रकांत ढेंगळे यांचा झेडपीकडून सन्मान

चंद्रकांत ढेंगळे यांचा झेडपीकडून सन्मान

ढेंगळी यांनी ‘माझे गाव माझे कुटुंब’ ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणून जवळगाव येथे ३५ कोरोना बाधितांना मदत केली, तसेच जोतिबाची वाडी येथे कोरोना रोखण्याकरिता शासकीय यंत्रणांना मदत करत गावातील अनेकांना कोरोना चाचणी करून घेण्यास तयार केले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला अशी शिफारस आरोग्य सेवक आर. एस. दराडे व ग्रामसेवक रोहिणी घुगे यांनी केली होती.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी सन्मान केला.

---

फोटो : १२ वैराग

चंद्रकांत ढेंगळे यांचा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, गटविकास अधिकारी शेखर सन्मान करताना.

----

Web Title: ZP honors Chandrakant Dhengale