जिल्हा परिषदेची निम्मी मालमत्ता झाली ‘गायब’

By Admin | Updated: July 30, 2014 01:34 IST2014-07-30T01:34:22+5:302014-07-30T01:34:22+5:30

५ वर्षांपासून ओरड: ४५५९ मालमत्तांपैकी २१०० मालमत्तांचा ७/१२ ‘हरवला’

Zilla Parishad assets worth `disappearance ' | जिल्हा परिषदेची निम्मी मालमत्ता झाली ‘गायब’

जिल्हा परिषदेची निम्मी मालमत्ता झाली ‘गायब’


सोलापूर: जिल्हा परिषदेच्या गेल्या टर्ममधील आणि या टर्ममधील सदस्य ओरडून त्यांचा घसा कोरडा झाला; मात्र प्रशासनातील अधिकारी आपल्या स्टाईलने काम करीत असल्यामुळे जि़ प़ मालमत्तांचा शोध अद्याप लागला नाही़ जि़ प़ मालकीच्या ४५५९ मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले असून, त्यातील २१०० मालमत्तांचा सात-बारा सापडत नाही़ अनेकांनी या जागा हडप केल्या आहेत तर काहींनी येथे अतिक्रमणे थाटली आहेत़
जिल्हा परिषदेच्या विविध ठिकाणी मोक्याच्या आणि करोडो रुपयांच्या जागा आहेत; मात्र कुणी नाममात्र भाड्याने घेतल्या तर कुणी संस्थेच्या नावावर हडप केल्या़ अनेक जागांवर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत़ जि़ प़ अधिकाऱ्यांनी सर्व नियम, कायदे गुंडाळून ठेवल्यामुळे गेल्या पाच वर्षांत हा प्रश्न सुटला नाही़ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची या कामासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली, त्यांचाच जागेवर पत्ता नसतो. त्यामुळे मालमत्तांचा शोध लागणार कधी, हा संशोधनाचा विषय आहे़ दोन वर्षांपूर्वी मालमत्ता कक्षही स्थापन करण्यात आला होता; मात्र सध्या तो बंद आहे़
यापूर्वीच्या टर्ममधील सदस्य बाबा कारंडे, श्रीकांत देशमुख तसेच सध्या सुरेश हसापुरे, शिवाजी कांबळे आदींनी वारंवार या विषयाला वाचा फोडली; मात्र यातून काही साध्या झाले नाही़ नवे जि़ प़ सीईओ काकाणी बुधवारी रुजू होणार असून, त्यांनादेखील या मालमत्तांचा सामना करावा लागणार आहे़
----------------------------
खोटी आश्वासने
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेत आणि प्रत्येक स्थायी समितीमध्ये मालमत्तांचा विषय येतो; मात्र अधिकारी वेळ मारून नेतात़ दोन महिन्यांपूर्वी झालेल्या स्थायी समितीमध्ये २० जुलै ही डेडलाईन जि़ प़ अध्यक्षा निशिगंधा माळी यांनी अधिकाऱ्यांना दिली होती़ त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. मात्र जि़ प़ सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना कोणीही घाबरत नाही हे पुन्हा दिसून आले आहे़ महिना संपला तरी याची माहिती पुढे आली नाही़ अधिकाऱ्यांनी दिलेली खोटी आश्वासने ऐकून पदाधिकारी गप्प बसतात़
-----------------------------
अनेक जागांचे ७/१२ गायब
जि़ प़ ची एकूण ४५५९ मालमत्ता
शिक्षण विभागाचे ८६५ उतारे नाहीत
लघुपाटबंधारे विभागाचे १०७० पैकी १०३ उतारे नाहीत
पशुवैद्यकीय विभागाचे १४९ उतारे नाहीत
आरोग्य विभागाचे ११९ उतारे नाहीत

Web Title: Zilla Parishad assets worth `disappearance '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.