शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाई रंगली शिवरुपात; शिवगंध, बाळी अन् दाढीसह तलवारकट मिशांचीही वाढली क्रेझ

By appasaheb.patil | Updated: February 19, 2019 14:29 IST

आप्पासाहेब पाटील ।  सोलापूर : मराठी मुलखात शिवराय म्हणजे प्रत्येकाचे जीव की प्राण. महाराजांची प्रत्येक गोष्ट अनुकरणीय अन् आदर्श. ...

ठळक मुद्देशिवजयंतीच्या निमित्ताने सोलापुरातील असंख्य तरूणांनी मोठ्या अभिमानाने राजेंसारखी दाढी राखलीशहरात शिवजयंतीचा उत्सव शिगेला पोहोचला आहे़ शहर शिवमय झालेछत्रपतींचे नाव घेऊन मिशांवरून बोटे फिरवली तरी इतिहासाचे स्फुरण चढते

आप्पासाहेब पाटील । 

सोलापूर : मराठी मुलखात शिवराय म्हणजे प्रत्येकाचे जीव की प्राण. महाराजांची प्रत्येक गोष्ट अनुकरणीय अन् आदर्श. नव्या पिढीतील तरूणाई तर हल्ली शिवमय झालेली आहे. शिवबाळी, शिवगंध लावून ही तरुणाई शिवरुपात दिसत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने सोलापुरातील असंख्य तरूणांनी मोठ्या अभिमानाने राजेंसारखी दाढी राखली असून, या दाढीचा तरूणाईला मोठा अभिमान आहे.

शहरात शिवजयंतीचा उत्सव शिगेला पोहोचला आहे़ शहर शिवमय झाले आहे़ सर्वत्र शिवाजी महाराजांचा जयजयकार होत असताना आपण छत्रपतींसारखे दिसावे म्हणून आजची तरुणाई धडपडत आहे़ अनेक तरुण पिळदार मिशी राखत असून, मिशी  तलवारीसारखी टोकदार व धारदार बनवत आहेत. 

छत्रपतींसारखी रुबाबदार मिशी बनवून आपणही राजेंचे कणखर मावळे असल्याचे त्यांना वाटत आहे. छत्रपतींचे नाव घेऊन मिशांवरून बोटे फिरवली तरी इतिहासाचे स्फुरण चढते. नुसत्या मिशाच नाही तर पूर्ण चेहरा छत्रपतींसारखा कसा दिसेल, याकडे तरुणाई लक्ष देत आहे. त्यासाठी दाढीचा आकारही राजेंसारखा बनविला जात आहे. एकेकाळी क्लीन शेव्हड राहणं पुरुषांसाठी फार महत्त्वाचं मानलं जात होतं. 

गालावर वाढत असलेले दाढीचे छोटे खुंटही ताबडतोब हटवले जात होते, पण आज हे चित्र पूर्णत: बदलले आहे. 

क्रिम्स, केमिकल व साहित्य बाजारात़...- सध्या दाढी वाढविणे व राखण्यासाठी बाजारात नवनव्या प्रकारच्या क्रिम्स, केमिकल व साहित्य बाजारात आले आहेत़ त्यात प्रामुख्याने बेआर डू व वुस्त्रा या नावाच्या क्रिम चांगल्या गाजत आहेत़ या क्रिम्समुळे दाढीच्या केसांना शायनिंग, कडकपणा, रुबाबदारपणा याशिवाय सेफ देण्यासही याचा चांगला उपयोग होतो़ याशिवाय शेव्हिंग जेलही बाजारात सध्या जास्तीचा भाव खात आहे़ दरम्यान, घरच्या घरी दाढी करता यावी व सेफ देता यावा, यासाठी दहा ते बारा प्रकारचे कंगवे बाजारात आले आहेत़ तीन बोटांत, चार बोटांत बसण्याइतके थोडे व मोठे कंगवे आहेत़ 

आम्ही डॉक्टरी पेशात काम करीत असल्यामुळे दाढी ठेवणे चालत नाही़ मात्र शिवरायांचे विचार मनात आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी शिवदाढी ठेवली आहे़ मात्र परीक्षा व अन्य कारणांसाठी दाढी ठेवणे जमत नाही़ तरीही आम्ही दाढी ठेवणे पसंत करतो़ दाढी ठेवल्यामुळे चेहºयाला एक वेगळ्याच प्रकारचा लूक प्राप्त होतो़-डॉ़ प्रतीककुमार शिंदे,शासकीय रुग्णालय, सोलापूऱ

शिवजयंतीमुळे मागील तीन महिन्यांपासून युवकांमध्ये दाढी ठेवण्यासाठी स्पर्धा वाढली आहे़ शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपतींच्या विचारांचा वारसासुद्धा तरुण पिढी पुढे चालवित आहे़ खास दाढी ठेवण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या क्रिम्स, केमिकल व साहित्य बाजारात आले आहेत़ युवकांमध्ये दाढी वाढविण्याची क्रेझ वाढत आहे़- आकाश गोरे, हेअर स्टाईलिश

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज