शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

घरखर्चाला पैसे आणतो म्हणून गेलेल्या युवकाचा सोलापुरात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 11:00 IST

सोलापूर : उद्या कामाला जातो, दोन-तीनशे रुपये घरखर्चाला घेऊन येतो असे सांगून पहाटे ५ वाजता घराबाहेर पडलेल्या तरुणाचा अज्ञात ...

ठळक मुद्देअज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकारया प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

सोलापूर : उद्या कामाला जातो, दोन-तीनशे रुपये घरखर्चाला घेऊन येतो असे सांगून पहाटे ५ वाजता घराबाहेर पडलेल्या तरुणाचा अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आला. 

सागर प्रकाश सरवदे (वय २५, रा. २७/क, जोशी गल्ली, रविवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागर सरवदे हा आई निर्मला, वडील प्रकाश, दोन बहिणीसोबत जोशी गल्ली येथे राहात होता. हे कुटुंब गेल्या ४0 वर्षांपासून काळा पोलीस चौकी, लालबाग मुंबई येथे राहत होते. हे कुटुंबीय अधूनमधून सणाला, देवकार्याला सोलापुरात येत होते. सागर सरवदे याचा चुलत आजोबा सिद्राम भोसले हा मयत झाल्याने सर्व कुटुंबीय सोलापुरात आले होते. वडील प्रकाश हे आजारी पडल्यामुळे सर्वजण गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून सोलापुरात राहत होते. सोलापुरात उदरनिर्वाहासाठी सागर हा मार्केट यार्डात हमाली काम करण्यासाठी जात होता. 

सागर सरवदे रोज पहाटे ५ वाजता जाऊन सकाळी १0 वाजता घरी येत होता. मंगळवारी रात्री ८.३0 वाजता सागर सरवदे हा घरी आला. सर्वजण जेवण करून बसले होते तेव्हा सागर आईला म्हणाला की, उद्या सकाळी मी यार्डात कामाला जातो दोन-तीनशे रूपये घेऊन येतो. रात्री ११.३0 वाजता सागर सरवदे त्याच्या दुसºया खोलीत झोपण्यासाठी गेला. बुधवारी पहाटे ५ वाजता उठून तो नेहमीप्रमाणे कामाला निघून गेला. सकाळी ७ वाजता नंदना ही मावशी मावशी म्हणत सागरच्या घराचा दरवाजा वाजवू लागली. आई निर्मला सरवदे यांनी दार उघडले असता नंदना हिने सागरला पिठाच्या गिरणीच्या बोळात कोणीतरी मारून टाकले आहे असे सांगितले. 

आई आणि दोन बहिणी भुलाभाई चौकाजवळील पिठाच्या गिरणीजवळ धावत गेल्या. तेथे सागर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जवळच मोठा दगड आणि फरशीचे तुकडे पडले होते. काही वेळात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. एच. पाटील करीत आहेत. 

मुंबईचा बेत फसला... सागरचा सोलापुरात घात झाला...च्सागर सरवदे हा काळा पोलीस चौकी, लालबाग मुंबई येथेही राहत होता. तो तेथील गणेश हॉलमध्ये काम करीत होता. ३ ते ४ महिन्यांपासून सोलापुरात राहिल्यानंतर पुन्हा तो आई-वडिलांसह पुन्हा मुंबईला जाण्याच्या तयारीत होता. मुंबईला जाण्याची तयारीही झाली होती. खर्चाला पैसे होतील या आशेपोटी सागर घरातून बाहेर पडला होता; मात्र त्याचा खून झाल्याची वार्ता घरी समजली आणि आई, वडील, दोन बहिणींनी घटनास्थळी सागरला पाहून टाहो फोडला. 

च्सागर याला दोन भाऊ असून तेही करून खाण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या प्रकारामुळे रविवार पेठेत खळबळ उडाली आहे. च्खून कोणी केला, कशासाठी केला याचा अद्याप तपास लागला नाही. पोलिसांनी संशयावरून जोशी गल्लीतील एकास ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस