शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

१५ फूट उंच जुना पुना नाका पुलावरुन तरुण कोसळला, दोघांवर रुग्णालात उपचार

By विलास जळकोटकर | Updated: April 20, 2024 11:49 IST

मोहन शिवाजी देवाळकर (वय- ३३), सुरज अशोक पांडे (वय- ३२, दोघे रा. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.

सोलापूर : मुंबईहून हैद्राबादकडे वेगाने निघालेल्या रुग्वाहिकेचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्यानं ती डिव्हायडरला धडकून पलटी झाली. यात रुग्णवाहिकेच्या समोरच्या काचा फुटून एक तरुण १५ फूट उंचावरुन कोसळला. अन्य एकजण जखमी झाला. जुना पुना नाका पुलावर शनिवारी सकाळी ८:४५ च्याव सुमारास हा धक्कादायक अपघात झाला. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोहन शिवाजी देवाळकर (वय- ३३), सुरज अशोक पांडे (वय- ३२, दोघे रा. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.

अधिक मिळालेली माहिती अशी की, एम. एच. ०३ सी व्ही ७८३६ या क्रमांकाची रुग्णवाहिका घेऊन वरील जखमी कोल्हापूरहून हैद्राबादकडे तेथून रुग्ण आणण्यासाठी निघाले होते. ही गाडी बाळे पार करुन जुना पुनानाका पुलावरुन पास होताना अचानक गाडीचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटला. यात रुग्णवाहिका डिव्हायडरला धडकून पलटी झाली.

रुग्णवाहिकेच्या समोरील काच फूटून आतील तरुण सुरज पांडे हा पुलावरुन जवळपास १५ फूट खाली कोसळला. यात त्याच्या दोन्ही हाताला मुका मार लागला. तर मोहन देवाळकर याच्या डोक्याला व हाता-पायास गंभीर जखम झाली. दोघांनाही तातडीने येथील शासकीय रुग्णायात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या दोघेही शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलीस तातडीने घटनास्थळी..जुना पुना नाका पुलाजवळ अचानक मोठा आवाज आल्यानं एकच धांदल उडाली. आजूबाजूची मंडळी धावली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत फौजदार चावडीच्या पोलिसांनीही धाव घेऊन प्रथम जखमीला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

रुग्ण आणण्यासाठी निघाले होते हैद्राबादलासंबंधीत रुग्णवाहिका कोल्हापूरहून हैद्राबाद येथून एका रुग्णाला घेऊन येण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेतच ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात