शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

पाणी टंचाईवर मात करून पेरू उत्पादनातून कमविले तरूणाने दीड लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 10:25 AM

वाळूजच्या युवा शेतकºयाची यशोगाथा; डाळिंब, द्राक्ष, कलिंगड पिकांचीही साथ; पाणीटंचाईवर मात

ठळक मुद्देकेवळ ५० गुंठे क्षेत्रातील पेरूच्या बागेतून तब्बल दीड लाख रुपयांचे उत्पन्न शेतकरी घाडगे यांनी पेरूची लागवड करून पाणीपुरवठा ठिबक सिंचनने केला आजअखेर सरासरी ४ टन माल विकला, त्यास सरासरी ४० रुपये किलोप्रमाणे दरही मिळाला

संभाजी मोटे 

वाळूज : वडील मूळचे शेतकरीच... पण ते पारंपरिक शेती करायचे़ त्यांना सहकार्य करण्यासाठी बारावीलाच शिक्षण सोडले़...शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे ठरविले अन् प्रथम सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग केली़ त्या पेरूने चक्क लखपतीच बनविले, असे तरुण शेतकरी सागर भानुदास घाडगे हे सांगत होते.

वाळूज (ता़ मोहोळ) येथील युवा शेतकरी सागर भानुदास घाडगे यांनी केवळ ५० गुंठे क्षेत्रातील पेरूच्या बागेतून तब्बल दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेतले़ सागरने पारंपरिक शेती सोडून काहीतरी शेतीत नवीन प्रयोग करावा म्हणून पेरूची बाग केली. यासाठी सर्वप्रथम ५० गुंठे क्षेत्रावर शेतीची मशागत केली़ त्यानंतर त्यात शेणखत आणि कोंबडी खत टाकले़ त्यात १५ बाय १५ अंतरावर पेरूची २८० झाडे लावली़ झाडे तयार केली़ शेतकरी घाडगे यांनी पेरूची लागवड करून पाणीपुरवठा ठिबक सिंचनने केला. त्यानंतर कोणत्याही प्रकारची रासायनिक खते टाकली नाहीत़ केवळ शेणखताचाच वापर केला़ शिवाय कुठलेही कीटकनाशकही फवारले नाही़ त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पेरूचे उत्पादन घेतले़ परिणामी त्याचा आकारही मोठा आणि चवही वेगळी जाणवली़ याच गुणवैशिष्ट्यमुळेच या पेरूकडे ग्राहक आकर्षित होऊ लागला़ हा पेरू केवळ स्थानिक बाजारपेठेत विकला गेला़. यासाठी ५० गुंठे क्षेत्रात एकूण केवळ १० हजार रुपये खर्च केला़ आॅक्टोबर महिन्यापासून पेरू तोडणीला सुरुवात केली.

 आजअखेर सरासरी ४ टन माल विकला आहे़ त्यास सरासरी ४० रुपये किलोप्रमाणे दरही मिळाला़ हा पेरू स्थानिक आठवडा बाजारात विकला़ याशिवाय काही व्यापारी बागेत येऊन पेरू घेऊन गेले़ त्यातून दीड लाख रुपयांचा नफा झाल्याचे सागर यांनी सांगितले़ आमची एकूण २० एकर शेती आहे़ उर्वरित क्षेत्रात ऊस, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके घेतली जातात.

शेतकºयांनी पारंपरिक ज्वारी, हरभरा या पिकांबरोबरच शेतीत नवनवीन प्रयोग करावेत़ त्यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळतेच़ विशेष म्हणजे विषमुक्त शेती करण्यावर जास्त भर द्यावा. त्यामुळे मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही़- सागर घाडगे, युवा शेतकरी, वाळूज

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळेAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार