उडीद काढण्याच्या मशीनमध्ये अडकून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:49 IST2021-09-02T04:49:00+5:302021-09-02T04:49:00+5:30
केतन राजेंद्र वीर असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. सौंदे येथील राजेंद्र वीर यांनी या वर्षीच ट्रॅक्टरसोबत उडीद काढण्याची ...

उडीद काढण्याच्या मशीनमध्ये अडकून युवकाचा मृत्यू
केतन राजेंद्र वीर असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. सौंदे येथील राजेंद्र वीर यांनी या वर्षीच ट्रॅक्टरसोबत उडीद काढण्याची पट्ट्याची मशीन आणली आहे. या सीझनमध्ये काम करत असताना त्यांचा एकुलता एक मुलगा केतन हा मशीन सोबत होता. उडीद काढताना मशीनमधील कचरा पायाने काढत होता. त्याचा पाय मशीनमध्ये गेला. तसे मशीनने त्याला ओढले. त्यामुळे मशीनमध्ये पाय तुटले व शरीर बाजूला पडून त्याचा मृत्यू झाला. अनपेक्षित घडलेल्या घटनेने सौंदे गावावर शोककळा पसरली आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने वीर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केतन वीर हा बारावी झालेला असून, सातत्याने नवीन व्यवसाय करण्याची त्याची धडपड होती. त्याच्याच प्रयत्नातून हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता.
फोटो: जिल्हा सोलवर सोडला आहे तो बातमीत घ्यावा.