शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

युवकांचे योगदान; गाईसाठी भूसा तर कुत्र्यांसाठी बिस्कीटांचा घास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:03 IST

मुक्या जनावरांची भूख भागविण्यासाठी धडपड; सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

ठळक मुद्देलॉकडाउन करण्यात आल्यापासून रस्त्यावर फिरणाºया मोकाट जनावरांवरही आता उपासमारीची वेळ येत आहेसोलापुरातील अनिकेत घनाते, ऋ तिक आवटे या तरुणांनी पुढाकार घेत रस्त्यावरील मोकाट जनावरांना अन्न देण्याचे काम हे सुरू केले कुत्र्यांसाठी त्यांचे खाद्यपदार्थ, पेट फूडस्, तर गार्इंसाठी भुसा खरेदी केला आणि लगेच वाटण्यास सुरुवात

सोलापूर : सध्या लॉकडाउनचा कालावधी सुरू आहे. यामुळे माणसांबरोबर मुक्या प्राण्यांवरही उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे अनेक प्राणी हे भुकेने व्याकूळ झालेले चित्र सध्या दिसत आहे. यामुळे दोन तरुणांना या मुक्या भटक्या प्राण्यांसाठी अन्न देण्याचा चंग बांधला आणि गेल्या आठ दिवसांपासून प्राण्यांना चारादान करण्याचे काम ते करत आहेत.

लॉकडाउन करण्यात आल्यापासून रस्त्यावर फिरणाºया मोकाट जनावरांवरही आता उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे सोलापुरातील अनिकेत घनाते, ऋ तिक आवटे या तरुणांनी पुढाकार घेत रस्त्यावरील मोकाट जनावरांना अन्न देण्याचे काम हे सुरू केले आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरून आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी त्यांच्या या विधायक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे त्यांनी लगेच कुत्र्यांसाठी त्यांचे खाद्यपदार्थ, पेट फूडस्, तर गार्इंसाठी भुसा खरेदी केला आणि लगेच वाटण्यास सुरुवात केली.

सध्या कोरोना व्हायरसचा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एकीकडे अनेकांचे पालक हे मुलांना बाहेर सोडण्यास तयार नाहीत. पण मुलांचा या चांगल्या उपक्रमाला ऋ तिक आणि अनिकेतच्या पालकांनी पाठिंबा दिला. त्यांनीही या उपक्रमामध्ये त्यांना साथ दिली. त्यांनी मागील आठ दिवसांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. ते सकाळी आठ ते सकाळी १० आणि सायंकाळी ७ ते रात्री आठवाजेपर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये जनावरांना खाऊ देण्याचे काम सुरू केले आहे. या नावीन्योर्ण उपक्रमाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. शक्यतो हे दोघे मुख्य रस्त्यावरील मोकाट जनावरांना खाद्य देतात. त्यांनी आतापर्यंत नवीपेठ, आसरा चौक, सैफुल, अशोक नगर, बाळी वेस, सरस्वती चौक, आदित्य नगर आदी भागात जाऊन त्यांनी सेवा दिली आहे.या उपक्रमामध्ये अनिकेत घनाते, ऋ तिक आवटे, विनायक सारंगीमठ, स्वप्नजा जाधव, भूषण वडगावकर, ऋ त्विक जेठीथोर, प्रयाग चौधरी हे सहभागी आहेत.

- सहज सुचल्यानंतर आम्ही हा उपक्रम राबविल. याला सर्वंच लोकांनी खूप मदत केली. पण याचबरोबर अनेक ठिकाणी नाकाबंदी आहे. यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला पोलिसांनी अडवले, पण त्यांना आमच्या उपक्रमाची माहिती दिल्यावर त्यांनीही आम्हाला खूप सपोर्ट केला, असे मतही अनिकेत आणि ऋ तिक यांनी व्यक्त केले.

सहज बसल्यानंतर आम्हाला प्राण्यांबद्दल विचार आला. यामधूनच आम्ही त्यांना खाद्य देण्याचा उप्रकम हाती घेतला. यामध्ये आमच्या कुटुंबीयांचेही सहकार्य मिळाले. आम्ही व्हॉट्सअ‍ॅप माध्यमातून आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पोलीस प्रशासनाकडूनही आम्हाला सहकार्य मिळाले. आता या कार्यातून आम्हाला खूप आनंद मिळत आहे.-अनिकेत घनाते, ऋ तिक आवटे

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस