पानगाव येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST2021-01-15T04:19:15+5:302021-01-15T04:19:15+5:30
संदीप हा दोन वर्षांपासून पुण्यात एका कंपनीत कामास होता. पती-पत्नी हे दोघेही पुण्यातच राहत होते. दरम्यान, पत्नी बाळंतपणासाठी माहेरी ...

पानगाव येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
संदीप हा दोन वर्षांपासून पुण्यात एका कंपनीत कामास होता. पती-पत्नी हे दोघेही पुण्यातच राहत होते. दरम्यान, पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेल्याने तो ११ रोजी पानगाव येथे आला. तेव्हा तो दारूच्या नशेत होता. घरात तो कोणाशी बोलत नव्हता. जेवण न करता झोपी गेला. बुधवारी सकाळी वडील नेहमीप्रमाणे सकाळी दुकानात गेले. खोलीत झोपलेला मुलगा बराच वेळ उठला नाही, म्हणून आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कडी होती. पुतण्याच्या मदतीने दार उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र न उघडल्याने वडिलांना बोलावून आणले. त्यांनी खिडकीतून पाहिले असता गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर भावकीतील लोकांना बोलावून पत्रे उचकटून त्यास तातडीने बार्शीत खासगी दवाखान्यात दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. याबाबत वडील कैलास सोपान वाघमारे यांनी बार्शी तालुका पोलिसांत खबर दिली आहे. पुढील तपास हवालदार रियाज शेख हे करत आहेत.