न्यू पॅलेस परिसरातून तरुण बेपत्ता

By Admin | Updated: December 26, 2014 00:45 IST2014-12-26T00:32:53+5:302014-12-26T00:45:47+5:30

माहिती मिळाल्यास -कुठे दिसल्यास ९७६३७२५२४४ या क्रमांकावर संपर्क साधावा,

Youngest missing from New Palace area | न्यू पॅलेस परिसरातून तरुण बेपत्ता

न्यू पॅलेस परिसरातून तरुण बेपत्ता

कोल्हापूर : येथील अक्षय जयंत सकट (वय १७, रा. न्यू पॅलेस परिसर) हा तरुण बुधवारी सायंकाळपासून घरातून निघून गेला आहे. त्यासंबंधीची तक्रार पालकांनी आज, गुरुवारी शाहूपुरी पोलिसांत दिली. अक्षय महावीर महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिकतो. सायंकाळी क्लासला जातो असे सांगून तो निघून गेला, तो रात्री परत आलाच नाही. पालकांनी रात्रीपासूनच त्याचा नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याकडे शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही. त्याच्यासंबंधी काही माहिती मिळाल्यास अथवा तो कुठे दिसल्यास तातडीने मो. ९७६३७२५२४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Youngest missing from New Palace area