तोंडाला मास्क बांध म्हटल्याने लहान भावाची बहिणीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:22 IST2021-05-13T04:22:55+5:302021-05-13T04:22:55+5:30

सावे येथील प्रतीक्षा बंडगर यांच्या किचनवर पत्रा टाकण्याचे काम चालू होते. त्यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रतीक्षा बंडगर हिने लहान ...

The younger brother's sister was beaten for wearing a mask over his mouth | तोंडाला मास्क बांध म्हटल्याने लहान भावाची बहिणीला मारहाण

तोंडाला मास्क बांध म्हटल्याने लहान भावाची बहिणीला मारहाण

सावे येथील प्रतीक्षा बंडगर यांच्या किचनवर पत्रा टाकण्याचे काम चालू होते. त्यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रतीक्षा बंडगर हिने लहान भाऊ मंगेश माणिक बंडगर यास तोंडाला मास्क लावण्यास सांगितले. यावेळी त्याने तोंडाला मास्क लावण्याऐवजी बहीण प्रतिक्षाला वेडेवाकडे बोलून शिवागाळ करू लागला. त्यावेळी तिने तू शिवीगाळ का करतोस असे म्हणाली असता त्याने तेथेच पडलेले बेडगे घेऊन अंगावर धावून आला. त्यावेळी मामाचा मुलगा समाधान इमडे यांनी मंगेशच्या हातून बेडगे हिसकावून घेतले. तरीही त्याने तेथे पडलेली लाकडी काठी घेऊन बहिणीच्या पाठीवर मारत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

भांडणाचा आवाज ऐकून आई मायाबाई हिने धावत येऊन भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा मंगेश याने आईलाही शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत प्रतीक्षा बंडगर हिने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: The younger brother's sister was beaten for wearing a mask over his mouth