म्हैस आणायला गेलेला तरुण मिक्सरच्या धडकेत ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST2021-06-16T04:30:38+5:302021-06-16T04:30:38+5:30
सांगोला : हातीद येथून जनावर बाजारातून म्हैस आणायला गेलेला तरुण दुचाकी आणि मिक्सर वाहनाला अपघातात तरुण जागीच ठार ...

म्हैस आणायला गेलेला तरुण मिक्सरच्या धडकेत ठार
सांगोला : हातीद येथून जनावर बाजारातून म्हैस आणायला गेलेला तरुण दुचाकी आणि मिक्सर वाहनाला अपघातात तरुण जागीच ठार झाला, तर त्याचा चुलत भाऊ जखमी झाला. अपघातानंतर चालक मिक्सर घेऊन पळून गेला; परंतु पोलिसांनी माग काढीत ते वाहन ताब्यात घेतले.
आबासाहेब संभाजी पाटील (वय ३६) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास सांगोला - मिरज महामार्गावर हातीद गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवर मागे बसलेला भाऊ राहुल दादासाहेब पाटील (वय ३९, दोघेही रा. गुंडेवाडी, ता. मिरज) हा जखमी झाला.
गुंडेवाडी येथील आबासाहेब संभाजी पाटील व राहुल दादासाहेब पाटील हे दोघे चुलत भाऊ असून मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास दुचाकी (एमएच- १० सीडब्ल्यू- ०९५९) वरून मेडशिंगी येथे म्हैस खरेदीसाठी निघाले होते. सांगोला - मिरज महामार्गावर त्यांची दुचाकी आली असता सांगोल्याहून भरधाव येणाऱ्या (एम.पी.- ३९, एच.- ३१५९) मिक्स वाहनाची समोरून जोराची धडक दिली. अपघातात आबासाहेब पाटील गंभीर जखमी होऊन मृत पावला तर चुलत भाऊ राहुल दादासाहेब पाटील हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.