मोहोळमध्ये टमटम पलटी होऊन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST2021-05-17T04:21:03+5:302021-05-17T04:21:03+5:30

मोहोळ : सळई घेऊन निघालेला टमटम वळणावर पलटी होऊन तरुण ठार झाला. महेश विलास आदलिंगे (वय ३२, रा. नागनाथ ...

A young man was killed in a stampede in Mohol | मोहोळमध्ये टमटम पलटी होऊन तरुण ठार

मोहोळमध्ये टमटम पलटी होऊन तरुण ठार

मोहोळ : सळई घेऊन निघालेला टमटम वळणावर पलटी होऊन तरुण ठार झाला. महेश विलास आदलिंगे (वय ३२, रा. नागनाथ गल्ली, ता. मोहोळ), असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून, १६ मे रोजी सकाळी ९.३० वाजेदरम्यान मोहोळ परिसरात हॉटेल अहिल्यासमोर हा अपघात घडला.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार रविवारी सकाळी एक टमटम (एमएच-१३/ एएन-७५९९) सळई घेऊन पालखी मार्गाहून मोहोळच्या दिशेने वळत होती. वळणावर वाहन वेगात असल्याने टमटम पलटी झाली. या अपघातात टमटममध्ये बसलेला महेश आदलिंगे याच्या डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी झाला आणि जागीच मरण पावला.

याबाबत गणेश विलास आदलिंगे (रा. नागनाथ गल्ली, मोहोळ) यांनी याबाबत फिर्यादी दिली असून, टमटमचालक अजरुद्दीन आयुब शेख (रा. मोहोळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A young man was killed in a stampede in Mohol