वाहनांच्या समोरासमोर धडकेत तरुण जागीच ठार, दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST2021-09-22T04:25:41+5:302021-09-22T04:25:41+5:30

जखमींमध्ये गिरीश माने (वय-३२), हर्षवर्धन सर्वगोड (वय-३५, दोघे रा. गजानन नगर सोलापूर) यांचा समावेश आहे. जखमींना पुढील उपचारासाठी पाठविण्यात ...

The young man was killed on the spot in a head-on collision with two vehicles, both seriously | वाहनांच्या समोरासमोर धडकेत तरुण जागीच ठार, दोघे गंभीर

वाहनांच्या समोरासमोर धडकेत तरुण जागीच ठार, दोघे गंभीर

जखमींमध्ये गिरीश माने (वय-३२), हर्षवर्धन सर्वगोड (वय-३५, दोघे रा. गजानन नगर सोलापूर) यांचा समावेश आहे. जखमींना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

पोलीस सूत्रानुसार २० सप्टेंबर रोजी गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड व सुनील वाघमारे हे (एमएच १३ डीटी १८९१) या चारचाकी वाहनाने सांगोला येथे गेले होते. तेथील काम संपवून ते सांगोला येथून सोलापूरला निघाले होते. मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान वाहन मंगळवेढा-सोलापूर रोडवरील बेगमपूर येथे एसबीआय बँकेसमोर आले. समोरून येणाऱ्या (एमच १३ डीक्यू १२७०) ट्रकने चारचाकी वाहनाला समोरून धडक दिली. वाहन चालक पळून गेला आहे. या धडकेत सुनील वाघमारे जागीच ठार झाला. तर गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड हे दोघे गंभीर जखमी झाले, अशा आशयाची फिर्याद हर्षा कुमार कांबळे यांनी कामती पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The young man was killed on the spot in a head-on collision with two vehicles, both seriously