महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:23 IST2021-02-16T04:23:41+5:302021-02-16T04:23:41+5:30

आलेगाव येथील आरोपी नितीन भाऊसाहेब दिवसे याने २५ डिसेंबर २०१७ रोजी महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. याबाबत ...

Young man sentenced to one year in jail for molesting a woman | महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास वर्षाचा कारावास

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास वर्षाचा कारावास

आलेगाव येथील आरोपी नितीन भाऊसाहेब दिवसे याने २५ डिसेंबर २०१७ रोजी महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. याबाबत , पीडितेच्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून नितीन दिवसे यास अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक चंद्रकांत राठोड यांनी करून आरोपीविरुद्ध सन २०१८ साली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्या. ए. एच. शेख यांच्या न्यायालयात सदर केसचे कामकाज चालविले. या केसमध्ये सरकारी वकील नारवाडकर यांनी युक्तिवाद केल्याने पीडित महिला व तपासी अंमलदार पोलीस नाईक चंद्रकांत राठोड यांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली. आरोपीतर्फे ॲड. जे. डी साळुंखे यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी सहकार्य केले.

----

Web Title: Young man sentenced to one year in jail for molesting a woman