आजारास कंटाळून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:51+5:302021-09-04T04:26:51+5:30

सत्यवान हा बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडत चालले होते. तसेच त्यास दुर्धर आजाराचा त्रास होत होता. ...

Young man commits suicide due to illness | आजारास कंटाळून तरुणाची आत्महत्या

आजारास कंटाळून तरुणाची आत्महत्या

सत्यवान हा बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडत चालले होते. तसेच त्यास दुर्धर आजाराचा त्रास होत होता. गुरुवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्याचा भाऊ सचिन दहिभाते यांनी वैराग पोलिसांत दिली असून, वैराग पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपात पोलीस नाईक नाईकनवरे हे करीत आहेत.

...........

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले

वैराग : बार्शी तालुक्यातील आळजापूर येथे राहत्या घरातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने वैराग पोलिसांत दिली आहे. यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात

वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून बाथरूमला म्हणून बाहेर गेली; मात्र ती बराच वेळ घरी आलीच नाही. त्यामुळे मुलीचा आजूबाजूला शोध घेतला. ती दिसून आली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे, अशी फिर्याद मुलीच्या आईने दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide due to illness