विक्रीसाठी गांजा घेऊन जाणाऱ्या तरुणास अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST2021-02-15T04:20:48+5:302021-02-15T04:20:48+5:30

टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस निरीक्षक पी. व्ही. काशीद हे शहरात पेट्रोलिंग करीत असताना १३ रोजी रात्री ८.३० वाजेच्या ...

Young man arrested for selling marijuana, four days in police custody | विक्रीसाठी गांजा घेऊन जाणाऱ्या तरुणास अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी

विक्रीसाठी गांजा घेऊन जाणाऱ्या तरुणास अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी

टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस निरीक्षक पी. व्ही. काशीद हे शहरात पेट्रोलिंग करीत असताना १३ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच ४५-एजे-१३९४) एकजण संशयास्पदरित्या जाताना दिसला. त्यास थांबवून तपासणी केली असता त्यांच्या गाडीच्या डिक्कीत २० हजार ९०० रुपये किमतीचा दोन किलो ९०० ग्रॅम गांजा मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गौतम अजिनाथ भोसले (वय ३४, रा.वेणेगाव ता.माढा) असे नाव सांगितले. तो गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. पी. व्ही. काशीद यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्याच्याकडून एकूण ८० हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.

Web Title: Young man arrested for selling marijuana, four days in police custody