शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुझे दर्शन झाले आता...जातो माघारी पंढरीनाथा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 12:51 IST

आषाढी वारी सोहळा : भाविक निघाले परतीच्या प्रवासाला; दुसºयाच दिवशी निम्मी पंढरी रिकामी

ठळक मुद्देआषाढीनिमित्त पंढरीत १५ लाखांपेक्षा अधिक भाविकशहरातील गर्दी कमी झालीदर्शन रांगेत लाखावर भाविक

प्रभू पुजारीपंढरपूर : ‘तुझे दर्शन झाले आता।जातो माघारी पंढरीनाथा।।’ अशी सावळ्या विठ्ठलास आळवणी करून आषाढी वारी सोहळ्यानिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो वारकºयांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले़ त्यानंतर मंगळवारी जड अंत:करणाने सारा भार परब्रह्म विठ्ठल-रुक्मिणी यांच्यावर सोडून पंढरीचा निरोप घेतला. परिणामी दुसºयाच दिवशी निम्मी पंढरी रिकामी झाल्याचे दिसून आले़‘आता कोठे धावे मन,तुझे चरण देखिलिया !भाग गेला, शीण गेला,अवघा झाला आनंद !!’आषाढी एकादशी दिवशी पांडुरंगाचे चरणस्पर्श झाल्यानंतर अवघा शीण गेला आणि लाखो वारकरी आनंदाने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. पण पांडुरंगाची पंढरी सोडून जाण्याच्या हुरहुरीने भाविकांचे मन दाटून आले.

आषाढी एकादशीनिमित्ताने प्रमुख पालखी सोहळा, हजारो दिंड्यांसह रेल्वे, एस़ टी़ बस व खासगी वाहनांनी राज्याच्या कानाकोपºयांतून आलेल्या लाखो वारकºयांमुळे सारी पंढरीनगरी भक्तिमय बनली होती. गेल्या अनेक दिवसांपासून घुमणारे टाळ-मृदंग-वीणा यांचे स्वर यामुळे शहरातील सारे वातावरणच विठ्ठलमय झालेले होते. ६५ एकर परिसरांसह विविध मठ, मंदिर, धर्मशाळा आणि शहर व शहराबाहेर रिकाम्या जागेवर उभारलेल्या राहुट्यातून प्रवचन, कीर्तन, भजन, भारुड आदी कार्यक्रम रंगले, परिणामी सर्वत्र वारकरीमय वातावरण झाले होते. 

सोमवारी रात्रभर राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन केल्यावर मंगळवारी पहाटे चंद्रभागेचे स्नान करून काहींनी पांडुरंगाचे पदस्पर्श, मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेतले तर काहींनी कळसाचे दर्शन घेऊन सकाळपासूनच पंढरीचा निरोप घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे सकाळपासून शहरातून बाहेर जाण्यासाठी शिवाजी चौक ते स्टेशन रोड, सोलापूर मार्गावरील पुलावर, तीन रस्ता, गोपाळपूर रस्ता, करकंब रस्ता, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा बसस्थानक आदी ठिकाणी वारकºयांची दाटी झाली होती़ 

आषाढीनिमित्त पंढरीत १५ लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते, मात्र दुसºयाच दिवशी त्यातील ५० टक्क्यांहून अधिक भाविक दर्शन घेऊन गावाकडे परतले. त्यामुळे पंढरपुरात आज निम्मी गर्दी कमी झाली. शहरातील गर्दी कमी झाली असली तरी अजूनही दर्शन रांगेत लाखावर भाविक असल्याचे चित्र दिसत होते. 

आनंदाने मन अन् खरेदीने बॅग भरली !- वारकºयांनी परत जाताना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्ताशे, पेढा, हळद-कुंकू, बुक्का व विभुती, विठ्ठल-रक्मिणीमातेचे फोटो, टाळ-मृदंग-पेटी, पखवाज यासारखी संगीत वाद्ये, देवघरातील पितळी मूर्ती, दगडी मूर्ती, कुंकू, उदबत्त्या आणि घरातील चिमुकल्यांसाठी खेळणी अशी भरपूर खरेदी मोकळ्या हातांनी केली. महिला भाविकांनी समई, पणत्या, पंचपाळा यासह काटवट, बेलणे-पोळपाट, रवी आदी संसारिक साहित्यांची खरेदी केली़ त्यामुळे जाताना वारकºयांचे मन जसे आनंदाने भरले तसेच त्यांच्या बॅगाही खरेदीने भरल्या होत्या़

रात्रभर गरजली पंढरी...- आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आलेल्या भाविकांनी मठांमध्ये, राहुट्यांमध्ये भजन-कीर्तन भारूडाचा आनंद घेतला. त्यामुळे पंढरपूर शहरात रात्रीही दूरदूरपर्यंत टाळांचा किनकिनाट, पखवाजाची थाप, हरिनामाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाचा ध्वनी ऐकू येत होता. अनेक हौशी तरुण वारकºयांनी रात्री विविध ठिकाणची गर्दी कमी झाल्यावर वाजत गाजत भजन म्हणत विविध खेळ खेळले आणि वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचा आनंद लुटला.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी