शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

Teachers Day; तू शेतकºयाचा मुलगा आहेस, त्यांच्यासाठी काम कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:51 IST

आयकर विभाग सोडून आयएएस झालेल्या दीपक तावरे यांच्या जीवनाला आकार देणारे कोण आहेत ते दोन शिक्षक 

ठळक मुद्दे- डॉ. दिपक तावरे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत- सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर काम करताना त्यांनी अनेक शहराच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले- तावरे यांच्या कामामुळे सोलापूर शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने जात आहे

राकेश कदम 

सोलापूर : माझे शालेय शिक्षण पुण्यातील सेंट पॅट्रिक्स स्कूलमध्ये झाले. वर्गातील अनेक मुलांचे वडील, नातेवाईक परदेशात स्थायिक झालेले किंवा परदेशात व्यवसाय करणारे होते. ती मुलेही परदेशातच स्थायिक होणार असल्याचे सांगायची. माझ्याही मनात परदेशात स्थायिक होण्याची भावना निर्माण झाली होती. पण, ‘तू शेतकºयाचा मुलगा आहेस. तू शेतकºयांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे’, असे फादर फर्नांडो यांनी एकेदिवशी सांगितले. हे शब्द माझ्या मनाला भिडले.. अन् मी परदेशात स्थायिक व्हायचा विचार बदलून प्रशासकीय सेवेत यायचे ठरविले. हे सांगताना मनपा आयुक्त दीपक तावरे शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत होते. त्यांचे डोळेही पाणावले होते. 

फादर फर्नांडो, मावशीने दिले जीवनमूल्यांचे शिक्षणबारामती तालुक्यातील माळेगाव हे माझे मूळगाव. बालवाडीत असताना माझी मावशी कमल पाटील यांनी मला शिक्षणासाठी पुण्यात आणले. मावशीचे पती १९६२ च्या युद्धात शहीद झाले होते. पुण्यात तिला घर मिळाले होते. मावशीच्या तीन मुलींसोबत माझेही शिक्षण सुरू झाले. मावशी शिक्षिका होती. तिने मला जीवनमूल्यांचेही शिक्षण दिले. त्यावरच माझी वाटचाल सुरू झाली.  १२ वी झाल्यानंतर मला बीसीएसला प्रवेश मिळाला होता. पण फादर फर्नांडो यांचा तो संदेश लक्षात असल्याने मी बीसीएसऐवजी पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९९२ ते ९६ या काळात मी आयकर अधिकारी होतो. आता मी आयकर उपायुक्त असतो. मला राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेत यायचे होते. आयकर अधिकाºयाचे वेगळेच स्थान असते. प्रशासनात गेलास तर राजकीय लोक छळत राहतील, असे मला लोक सांगायचे. पण माझे ध्येय निश्चित होते. १९९६ साली सहकार विभागात रुजू झालो. त्यानंतर मी आयएएस झालो. 

एक चांगला माणूस हो...फादर फर्नांडो आणि शिक्षिका असलेल्या माझ्या मावशीने मला एक चांगला माणूस हो, असा संदेश दिला. स्व. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मी त्यांच्याकडे कार्यरत होतो. सहकार विभागात अनेक ठिकाणी काम केले. पण जीवनमूल्यांशी तडजोड करायची नाही, हे ठरविल्याने मला कुठली अडचण आली नाही. महाविद्यालयीन जीवनात आलेल्या प्राध्यापकांकडून मला खूप शिकायला मिळाले. 

माझ्या कुटुंबीयांनी, मावशीने आणि शिक्षकांनी मला जीवनमूल्यांचे शिक्षण दिले. आयकर अधिकारी म्हणून पुण्यात रुजू झालो तेव्हा शासकीय घर मिळाले. तेव्हा फिलिप्स कंपनीने दरमहा एक हजार रुपये भरून वस्तू विकत घेण्याची एक स्कीम काढली होती. या स्कीममधून मी एक टेपरेकॉर्डर, टीव्ही, फ्रीज घेतले. एकेदिवशी मावशी घरी आली. एकाच वेळी एवढ्या वस्तू कशा काय आणल्यास. काही वाईट काम तर तू करीत नाही ना, असा जाब तिने विचारला. मी स्पष्टीकरण दिले. या संस्कारामुळेच मी आजवर चुकीच्या गोष्टींना स्पष्टपणे विरोध करत आलोय. शिक्षक, कुटुंबीयांनी दिलेल्या या संस्कारांमुळे मी पारदर्शी कारभार करीत आलो.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTeachers Dayशिक्षक दिन