शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शरद पवार यांच्या विरोधात बोलायची तुमची लायकी नाही, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याना लगाविला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 10:47 IST

काही करायचं पण राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.

ठळक मुद्देसोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलनकाही करायचं पण राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असाल पण शरद पवार यांच्याविरोधात बोलायची तुमची लायकी नाही. तुम्ही दिवसा चहा पीत असला तरी रात्री कुठली आणि किती पिता हे माहीत आहे. काही करायचं पण राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलन सभा  नॉर्थकोट मैदानावर झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रकाश शेंडगे, जिल्हा निरीक्षक प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोलते-पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, उमेश पाटील, निर्मला बावीकर, सुनीता रोटे, मनोहर सपाटे, किसन जाधव, महेश गादेकर, जुबेर बागवान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.  धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस आज मुंबईत बोलताना पवार साहेब औषधाला उरणार नाही, असे बोलले. फडणवीसांचे गुरु दिल्लीत बसलेत. तुमचा गुरू पवार साहेबांचे बोट धरुन राजकारणात आल्याचे कबूल करतो. त्याचे तरी ऐका. पहिल्या अधिवेशनानंतरच तुमचे सरकार पडले असते. जनाची नाही तरी मनाची बाळगा, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार