शेटे वाड्यात योगदंडाची पूजा; सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ

By Appasaheb.patil | Published: January 11, 2023 03:06 PM2023-01-11T15:06:16+5:302023-01-11T15:07:51+5:30

सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधीस आज बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. 

yogadand puja at shete wada religious ritual of siddharameshwar yatra of solapur begins | शेटे वाड्यात योगदंडाची पूजा; सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ

शेटे वाड्यात योगदंडाची पूजा; सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर:सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधीस आज बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. हर्र बोला, हर्र... शिवयोगी सिद्धरामेश्‍वर महाराज की जयच्या जयघोषात व संबळच्या निनादात माणिक चौकातील शेटे वाड्यात योगदंडाची पूजा करण्यात आली. 

ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्‍वराच्या यात्रेला ऐतिहासिक परंपरा असून, यातील विधींही तितक्‍याच महत्त्वाच्या आहेत. प्रारंभी अष्टविनायकांची पूजा झाली. त्यानंतर शेटे वाड्यात सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाची पूजा करण्याबरोबरच हिरेहब्बूंची पाद्यपूजा, महाप्रसाद वाटपाने या यात्रेतील धार्मिक विधींना रविवारी सुरवात झाली. हर्र बोला, हर्र... शिवयोगी सिद्धरामेश्‍वर महाराज की जयच्या जयघोषात व संबळच्या निनादात हा विधी पार पडला. 

दुपारी बाराच्या सुमारास हिरेहब्बू वाड्यातून योगदंड संबळच्या निनादात शेटे वाड्याकडे मार्गस्थ झाले. दुपारी एकच्या सुमारास योगदंडासह मानकरी व पुरोहित शेटे वाड्यात दाखल झाले. ऍड. रितेश थोबडे व त्यांची पत्नी श्रद्धा थोबडे यांनी योगदंडाची पूजा केली. यावेळी ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. रितेश थोबडे, सुचेता थोबडे, श्रध्दा थोबडे, सिध्देश थोबडे, प्रियंका थोबडे, प्रतिक थोबडे, सुधीर थोबडे, विक्रांत थोबडे, गीता थोबडे, राजश्री देसाई, उमेश, शशांक, वैशाली अक्कलवाडे, शिवशंकर कंटीकर, सिध्देश्वर कंटीकर, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, अमित हब्बू राजेश हब्बू, आकाश हब्बू, सदानंद हब्बू, विजयकुमार हब्बू आदी मानकरी व सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: yogadand puja at shete wada religious ritual of siddharameshwar yatra of solapur begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.