शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

यंदा प्रथमच सोलापूरच्या तापमानाचा पारा ४२.८ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 14:38 IST

गतवर्षीपेक्षा यंदा सुरुवातीपासूनच सातत्याने सोलापूरच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दहा दिवसांपासून नोंदल्या गेलेल्या तापमानावर एक नजर टाकली असता ४०.७ अंश सेल्सिअसवरून थेट ४३ अंश सेल्सिअसकडे वाटचाल सुरू आहे.

ठळक मुद्देसोलापूर शहराचे सर्वोच्च तापमान २००५ सालात २० मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस नोंदले गेल्या दहा दिवसांपासून नोंदल्या गेलेल्या तापमानावर एक नजर टाकली असता ४०.७ अंश सेल्सिअसवरून थेट ४३ अंश सेल्सिअसकडे वाटचाल सुरू

सोलापूर: मार्च महिन्यातली गत आठवड्यातील उच्चांकी तापमानाची नोंद ताजी असतानाच बुधवारी एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच या वर्षातल्या सर्वोच्च ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद येथील हवामान खात्याच्या प्रयोगशाळेत झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा सुरुवातीपासूनच सातत्याने सोलापूरच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. 

गेल्या महिन्यापासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्यावर्षी २ मे ४३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले होते. अद्याप मे महिना उजाडायचा आहे. यावर्षी एप्रिलच्या प्रारंभीच पारा ४३ अंशाकडे वाटचाल करत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर मे अखेरपर्यंत सोलापुरातील गेल्या तीस वर्षांतील उच्चांकी तापमानाचा विक्रम मोडला जाईल, अशा प्रतिक्रिया शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे. 

दरवर्षी मे महिन्यामध्ये ४४ अंशावर नोंदले जाणारे तापमान यंदा एप्रिलमध्ये नोंदले जाते की काय, अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे रुग्णालयामध्ये उपचार घेणाºया बाल व वृद्ध रुग्णांवर याचा परिणाम होऊ लगला आहे. उन्हापासून बचावासाठी कार्य करणारे फॅन, कूलरही काम करेनासे झाले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.

 गेल्या दहा दिवसांपासून नोंदल्या गेलेल्या तापमानावर एक नजर टाकली असता ४०.७ अंश सेल्सिअसवरून थेट ४३ अंश सेल्सिअसकडे वाटचाल सुरू आहे. पर्यावरणाचा समतोल विस्कळीत होऊ लागल्यामुळेच हे चित्र निर्माण होत आहे. यासाठी ‘झाडे लावून त्यांचे संगोपन करायला हवे, अन्यथा पुढचा काळ याहून अधिक तीव्र असेल, अशा प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

२००५ ची पुनरावृत्ती होणार ?- सोलापूर शहराचे सर्वोच्च तापमान २००५ सालात २० मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस नोंदले आहे. यावर्षीची स्थिती पाहता यंदा त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यंदा झालेले पर्जन्यमानही त्याला कारणीभूत असावे असे म्हटले जात आहे. एप्रिल, मे असे दोन महिने अद्याप उन्हाळा असल्यामुळे यंदा तापमानाचा २००५ सालातला उच्चांक मोडला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमान