यंदा पाऊस ५० टक्क्यांनी कमी

By Admin | Updated: July 30, 2014 01:25 IST2014-07-30T01:25:25+5:302014-07-30T01:25:25+5:30

सरासरीही गाठेना : महिनाभरापासून रिकामे ढग

This year, 50 percent less rainfall | यंदा पाऊस ५० टक्क्यांनी कमी

यंदा पाऊस ५० टक्क्यांनी कमी


सोलापूर : काहीकेल्या पावसाची आकडेवारी पुढे सरकेना झाली असून, मागील वर्षीच्या ५० टक्केही पाऊस आजअखेर पडलेला नाही. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने पाण्याची पातळी वाढलेली नाही.
पावसाळ्याची पाच नक्षत्रे निघून गेली असून, एकाही नक्षत्राचा सर्वदूर पाऊस सोलापूर जिल्ह्यात झालेला नाही. एकेका भागात पाऊस पडत असल्याने काही भागांचे समाधान झाले आहे. मात्र तलाव, नद्या, नाले भरण्यासारखा पाऊस अद्याप झालेला नाही. २०११ व २०१२ ही दोन वर्षे पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. मागील वर्षी पुणे जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जुलैमध्ये उजनी धरणातून कॅनॉल व नदीतून पाणी सोडले होते. वजा ५० टक्के इतकी कमी झालेली पाण्याची पातळी २९ टक्के प्लसमध्ये आली होती. याशिवाय उजनीचे पाणी सोडल्याने कॅनॉललगतचे तलाव व बंधारे पाण्याने भरुन घेतले होते. यावर्षी पाऊस काहीकेल्या पडेना झाल्याने उजनी धरणासह जिल्ह्यातील तलाव कोरडेच आहेत. जून व जुलै महिन्यात एकूण २२३३.९ तर सरासरी २०३.०८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना यावर्षी एकूण १३०४.४७ मि.मी. तर सरासरी ११८.५९ मि.मी. पाऊस पडला आहे.
मागील वर्षी प्रत्यक्षात एकूण २५९४ मि.मी. पाऊस पडला होता. तुलनेत यावर्षी ५० टक्के पाऊस कमी झाला आहे.
--------------------------
यावर्षी २७ जुलैपर्यंत पडलेला पाऊस
उत्तर सोलापूर- १२४ मि.मी., दक्षिण सोलापूर-११८ मि.मी., बार्शी-११२ मि.मी.,अक्कलकोट-१०४ मि.मी., पंढरपूर-९२ मि.मी., मंगळवेढा- ११८ मि.मी., सांगोला-१९२ मि.मी., माढा-९५ मि.मी., मोहोळ-१२५ मि.मी., करमाळा-१४४ मि.मी., माळशिरस-८१ मि.मी. एकूण पाऊस १३०४ मि.मी. सरासरी पाऊस ११८.५९ मि.मी.
------------------------------------------
मागील वर्षी २७ जुलैपर्यंत पडलेला पाऊस
उत्तर सोलापूर- ३०५ मि.मी., दक्षिण सोलापूर-२२६ मि.मी., बार्शी-२७७ मि.मी.,अक्कलकोट-२६८ मि.मी., पंढरपूर-२३२ मि.मी., मंगळवेढा- १४९ मि.मी., सांगोला-१३७ मि.मी., माढा-३१९ मि.मी., मोहोळ-२४२ मि.मी., करमाळा-२२२ मि.मी., माळशिरस-२१७ मि.मी. एकूण पाऊस-२५९४ मि.मी., सरासरी पाऊस २३५.८५ मि.मी.

Web Title: This year, 50 percent less rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.