: माढा तालुक्यातील निमगाव (टें) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी यशवंत संजयमामा शिंदे यांची तर उपसरपंचपदी राणी सुनील येळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद बारंगुळे यांनी यांनी काम पाहिले. त्यांना सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी रामभाऊ मिटकल यांनी काम पाहिले.
यावेळी सरपंच, उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह शिंदे, उषा शिंदे, प्रताप शिंदे, मैनाबाई सरक, बापू लोंढे, शीतल खापरे, बालाजी सरक, उषा येळे, मनीषा मराठे उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच रवींद्र शिंदे, अशोक मराठे, बापूसाहेब शिंदे, नितीन मराठे, प्रवीण शिंदे, सुनील खापरे, रमेश परबत, संजय गरड, पोपट खापरे, कामराज कांबळे, संतोष वरपे, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, सोमनाथ शिंदे, गणेश शिंदे उपस्थित होते. निवडीनंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला.
फोटो
२४ निमगाव-सरपंच
ओळी
निमगावच्या सरपंचपदी यशवंत शिंदे यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना ग्रामस्थ.
Web Title: Yashwant Shinde unopposed as Sarpanch of Nimgaon
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.