शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यात, इथेनॉल निर्मितीने कारखानदारी अडचणीत : यशवंत कुलकर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 20:30 IST

साखर निर्यातीमध्ये ९०० रुपयांची तूट; इथेनॉलला उठाव कमी

ठळक मुद्देस्वदेशी व जैविक धोरणांतर्गत इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहनकारखानदारांना साखर निर्यात करणे व इथेनॉल निर्मिती करणे परवडत नाही़

श्रीपूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे भाव प्रति क्विंटल २ हजारापर्यंत आहेत़ साखर कारखानदारांनी बँकेकडून त्या साखरेवर २९०० रुपयांप्रमाणे कर्ज घेतले आहे़ साखर निर्यात करायचे ठरवले तर ९०० रुपयांची तूट कारखानदारांना सहन करावी लागणार आहे़ शिवाय इथेनॉल निर्मिती केली तर भारतात इंधनामध्ये केवळ ५ टक्के इथेनॉल वापरले जाते़ त्यामुळे त्याचा उठाव कमी आहे़ या दोन्ही बाबी लक्षात घेता साखर उद्योग भविष्यात संकटात सापडतील, असे मत श्रीपूर येथील पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉलच्या दरात वाढ केली़ शिवाय साखरेला २९०० हमीभाव जाहीर केला, या पार्श्वभूमीवर यशवंत कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मागील दोन वर्षांचा ऊस व साखर उत्पादनाचा आढावा घेतला तर हंगाम २०१६-१७ मध्ये देशांतर्गत २०३ लाख टन साखर उत्पादन झाले.

२०१७-१८ मध्ये मोठी वाढ होऊन ते ३२० लाख टनावर गेले. येणाºया गळीत हंगामात देशांतर्गत ३५५ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.  त्यामध्ये महाराष्ट्रात ११५ लाख टन उत्पादन होईल. म्हणजेच देशातील एकूण साखर खप लक्षात घेता १०५ लाख टन साखर शिल्लक राहील. त्यामुळे देशात साखरेचे दर कमी होणार याची भीती साखर उद्योगास असल्याचेही कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कारखानदरीला उभारी येण्यासाठी शासनाने त्यासाठी साखर निर्यात व इथेनॉल निर्मिती भर द्यावा असे सांगण्यात आले, पण महाराष्ट्रात साखरेचा दर २९०० रुपये आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तो दर २००० रुपये आहे़ साखर निर्यात करायचे ठरवले तर एका पोत्यामागे ९०० रुपयांची तूट कारखानदाराला सोसावे लागते, पण निर्यातीसाठी सरकार अनुदानाची रक्कम ५५ रुपये प्रति टन दोन वर्षानंतर देते़ ते कमी प्रमाणात आहे़ त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी व जैविक धोरणांतर्गत इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बी हेवी मोलासेसपासून बनणाºया इथेनॉलला ५ रुपये दर वाढवून दिला आहे. त्यामुळे बी हेवी मोलासेस इथेनॉलसाठी स्वतंत्र यंत्रणा कारखान्यास बसवावी लागेल़ भारतात इंधनामध्ये केवळ ५ टक्के इथेनॉलचा वापर होत असल्यामुळे याचा उठाव कमी आहे़ ते इथेनॉल साठवण्यासाठी कारखानदारांना अधिक आर्थिक भार पडतो़ त्यामुळे कारखानदारांना साखर निर्यात करणे व इथेनॉल निर्मिती करणे परवडत नाही़ परिणामी अडचणी वाढण्याची शक्यता आहे़ त्यासाठी शासनाने निर्यात अनुदानामध्ये वाढ करावे व  इंधनामध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवावे तर कारखानदारांना याचा आर्थिक फायदा होईल अन्यथा मोठे संकट असल्याची भीती यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने