याचि देही याचि डोळा, असा अनुभवला पालखी सोहळा
By Admin | Updated: June 26, 2015 00:06 IST2015-06-26T00:06:57+5:302015-06-26T00:06:57+5:30
अकोलेकर भाविकांनी केले पालखीचे हर्षोल्हासात स्वागत

याचि देही याचि डोळा, असा अनुभवला पालखी सोहळा
कोल्हापूर : मटक्याच्या गुन्ह्यांच्या तपासावरून सोलापूर जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयवंत बापूसाहेब खाडे यांच्यासह तिघा अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिल्याने कोल्हापूर पोलीस दलात गुरुवारी खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांचे मूळ गाव अंबप (ता. हातकणंगले) आहे. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्या जिल्ह्यामध्ये बदली करता येत नाही. तरीही त्यांची रत्नागिरीहून कोल्हापुरात बदली करण्यात आली होती. त्यांना शहरातील संवेदनशील असणाऱ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला होता. पदभार स्वीकारून सहा महिनेही पूर्ण झाले नसताना त्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला बदली झाली होती. सार्वजनिक गणेशोत्सवात मिरवणुकीदरम्यान त्यांच्याच हद्दीतील मंगळवार पेठ व शिवाजी पेठेतील मंडळांनी मिरवणुकीत डॉल्बी लावले होते. त्यामुळे वादावादी होऊन मिरवणूक रेंगाळली होती. त्यातच आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्याची प्रक्रिया याच पोलीस ठाण्यातून झाली होती. त्यामुळे या बदलीमागे याचेही कारण असण्याची शक्यता त्या दरम्यान चर्चिली जात होती. सोलापूर येथे १७ जूनला मटक्याच्या कारवाईवरून सहायक निरीक्षक चंद्रकांत माळी व उपनिरीक्षक गंगाधर जोगधनकर यांच्यात हाणामारी झाली होती. हा वाद खाडे यांच्या अंगलट आला आहे. यामध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे कोल्हापूर पोलीस दलात चर्चा रंगली आहे.(प्रतिनिधी)