शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दारू सोडविण्यासाठी चुकीचा उपचार; औरंगाबादमधील तरूणाचा पंढरपुरात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 18:00 IST

परवाना नसताना डॉक्टराने केला उपचार; छातीवर बसून उपचार करणाºया दोन डॉक्टरांविरुधद भावाने दिली तक्रार

ठळक मुद्दे- पंढरपूर शहरातील घटना, दोन डॉक्टरांविरूध्द दिली पोलीसात तक्रार- दारू सोडविण्यासाठी औरंगाबादहून आले होते लोक- परवाना नसताना दोन्ही डॉक्टरांनी केला चुकीचा उपचार

पंढरपूर : परवाना नसताना देखील पंढरपुरातील दोन डॉक्टर रुग्णांवर औषधोपचार करतात. त्यांच्या अघोरी उपचारामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे, अशी तक्रार डॉ. महेश काळे व डॉ. दिपक लोखंडे (रा. सांगोला रोड, एमएसईबीच्या पाठीमागे, पंढरपूर) यांच्याविरुध्द विकास पवार (रा. शिरजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात केली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिकी हरीशचंद्र पवार (रा. शिरजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला नातेवाईकांच्या सांगण्यावरुन दारुचे व्यसन सोडवण्यासाठी पंढरपूरमधील खाजगी डॉ. महेश काळे व डॉ. दिपक लोखंडे यांच्याकडे १८ डिसेंबर २०१८ घेवून आले हाते. तेव्हा डॉ. काळे व डॉ. लोखंडे यांनी एका पेशंटला १ हजार ३०० रुपये सांगितले. तसेच पोट साफ करण्यासाठी ५ हजार रुपये सांगितले. ती फी नाव नोंदणी करणारे रमेश भिमराव काळे यांच्याकडे जमा केली. त्यांनतर वाल्मिकीवर औधोपचार करण्यात आले. थोड्याच वेळात वाल्मिकीला जुलाब उलट्या सुरु झाल्या.

याबाबत दोन्ही डॉक्टरांना नातेवाईकांनी माहिती सांगितली. मात्र डॉक्टारांनी काही होणार नाही. रुग्णाला घेऊन जा असे सांगितले. वाल्मिकी यास पंढरपूरहून टेंभुर्णीमार्गे औरंगाबादला घेऊन जात होते. यावेळी करकंब येथे दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी बोलायचा बंद झाला.  थोड्या वेळाने त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. काळे व डॉ. लोखंडे यांना फोनवरुन सांगितले. त्यावेळी त्यांनी रुग्णाला घरी घेऊन जावा असे सांगितले. वाल्मिकीच्या मृतदेहाचे गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे पोस्टमॉर्टेम केले. तसेच गंगापूर येथे मयत दाखल करण्यात आले. तो गुन्हा पंढरपूर शहरकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीसांनी मयत निकाली काढले होते. परंतू आमचे समाधान न झाल्याने अवैध प्रॅक्टीस करणाºया दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करावी अशी तक्रार वाल्मिकी पवारचे बंधू विकास पवार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस उप. निरिक्षक दशरथ वाघमोडे करीत आहेत.-----------छातीवर बसून केला उपचारवाल्मिकीला या रुग्णाला डॉ. काळे याने व डॉ. लोखंडे यांनी प्रथम पातळ औषध प्यायला दिले. त्यानंतर वाल्मिकी याचे दोन्ही हात कापडाने बांधून त्यास जमिनीवर उताने झोपवून पायावर डॉ. लोखंडे बसले. व डॉ. काळे वाल्मिकीच्या छातीवर बसून त्याच्या नाकामध्ये औषधाचे थेंब सोडले. असल्याचा उल्लेख विकास पवार यांनी तक्रारीत केला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयPandharpurपंढरपूरAurangabadऔरंगाबाद