कुरुल प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST2021-04-28T04:23:31+5:302021-04-28T04:23:31+5:30

कुरुल : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय घाटुळे यांच्या हस्ते ...

World Malaria Day celebrated at Kurul Primary Health Center | कुरुल प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन साजरा

कुरुल प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन साजरा

कुरुल : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय घाटुळे यांच्या हस्ते डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

यावेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विकास भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य केंद्रामध्ये नवीन गप्पी मासे पैदास केंद्राचे उद्घाटन डॉ. घाटुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी समुदाय अधिकारी अर्चना बंडगर, आरोग्य सहायिका शहनवाझ शेख, औषध निर्माण अधिकारी सूर्यकांत शिंदे, कनिष्ठ लिपिक श्रीकांत रनखांबे, आरोग्यसेवक एम.एम. जोगदनकर, व्ही. आर. कदम, संजय राठोड, आरोग्य सेविका पी. आर. पाटील, एस. आर. बनकर , वैशाली निंबाळकर, चंद्रसेन जाधव, नानासाहेब पवार, महेश सुरवसे , परिचर लता पुकाळे उपस्थित होते.

----

२६ कुरूल

हिवताप दिनानिमित्त आजाराची माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ .घाटुळे, विकास भांगे, आरोग्य कर्मचारी.

Web Title: World Malaria Day celebrated at Kurul Primary Health Center