कामगारानं चोरले सहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:41 IST2021-03-04T04:41:18+5:302021-03-04T04:41:18+5:30

पाचेगाव खुर्द येथील सुभाष मिसाळ यांचे सांगोला येथील महात्मा फुले चौकात सचिन ज्वेलर्स अँड सन्स या नावाने सोने-चांदी दागिने ...

Workers stole six lakh gold and silver jewelery | कामगारानं चोरले सहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने

कामगारानं चोरले सहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने

पाचेगाव खुर्द येथील सुभाष मिसाळ यांचे सांगोला येथील महात्मा फुले चौकात सचिन ज्वेलर्स अँड सन्स या नावाने सोने-चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. सदर दुकानात ऋषिकेश शहाजी भडंगे यासह सात कामगार कामास आहेत. दुकानाच्या पाठीमागील बाजूस दागिने तयार करणे व रिपेअरिंग करण्यासाठी हॉल आहे. भडंगे हा सेल्समन रिपेअरिंग करण्याचे काम करतो. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ च्या सुमारास कामगार आण्‍णासो भडंगे हा चारचाकी गाडी साफ करताना त्याला दीड-दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या गोळ्या गाडीत सापडल्या. त्याने त्या मालकाकडे आणून दिल्या.

याबाबत दुकान मालक सुभाष रामचंद्र मिसाळ (रा. पाचेगाव खुर्द) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी ऋषिकेश भडंगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

---

चोरी कबूल केली..स्टाॅक तपासला

मालकाने चौकशी केली असता या गोळ्या दुकानातील कामगार ऋषिकेश भडंगे याने चोरी केल्याचे समजले. मालकाने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ३ ग्रॅम सोने व २०० ग्रॅम चांदी चोरी केल्याचे कबूल केले.दरम्यान सुभाष मिसाळ यांना संशय आल्याने त्यांनी दुकानातील स्टॉकची तपासणी केली. यावेळी १०० ग्रॅम सोने व २ किलो चांदी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

---

Web Title: Workers stole six lakh gold and silver jewelery