चिंचोळी एमआयडीसीत गॅसचा भडका उडून कामगार जखमी
By विलास जळकोटकर | Updated: June 19, 2023 18:40 IST2023-06-19T18:40:31+5:302023-06-19T18:40:51+5:30
सध्या त्याची प्रकती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

चिंचोळी एमआयडीसीत गॅसचा भडका उडून कामगार जखमी
सोलापूर : चिंचोळी एमआयडीसीमध्ये काम करताना गॅसचा भडका उडून अण्णाराव सिद्धाराम गंगदे (वय- २५, रा. हत्तुरे वस्ती, सोलापूर) हा तरुण भाजला. ही घटना रविवारी रात्री ९:३० वाजता घडली.
यातील जखमी हा चिंचोळी एमआयडीसी कोंडी-पाकणी येथे कामाला होता. रविवारी कामानिमित्त तो गेला होता. रात्री काम करीत असताना गॅसचा भडका उडाला. यामध्ये अण्णाराव याच्या डाव्या हाताला, छातीवर, तोंडावर भाजले. विमा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येऊन शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी भाऊ महेश याने दाखल केले. सध्या त्याची प्रकती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.