शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कामचुकार कंत्राटदारांना निविदा भरण्यास मनाई ! सोलापूर लघुपाटबंधारे विभागाचा नवा नियम, दर्जासाठी प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 13:00 IST

कामचुकारपणा, काम विक्री आणि निकृष्ट कामांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने आजवर कामात दिरंगाई केलेल्या ठेकेदारांना ई-निविदा भरण्यास मनाई केली आहे

ठळक मुद्देकामात दिरंगाई केलेल्या ठेकेदारांना ई-निविदा भरण्यास मनाईकामे पूर्ण न करणाºया ठेकेदारांवर कारवाई करण्याचे अधिकार शासनाने बांधकाम विभागाऐवजी जिल्हाधिकाºयांना दिलेकाम विक्रीला आळा बसणार !

राकेश कदम सोलापूर दि १० : कामचुकारपणा, काम विक्री आणि निकृष्ट कामांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने आजवर कामात दिरंगाई केलेल्या ठेकेदारांना ई-निविदा भरण्यास मनाई केली आहे. झेडपीकडे असे २५ टक्क्यांहून अधिक ठेकेदार आहेत. या लोकांमुळे झेडपीची प्रतिमा मलिन झाली आहे. निधीही खर्चात अडचणी आल्या आहेत. त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे.शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणारी कामे ५० टक्क्यांहून अधिक कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. कामे पूर्ण न करणाºया ठेकेदारांवर कारवाई करण्याचे अधिकार शासनाने नुकतेच बांधकाम विभागाऐवजी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीतही मोहोळ तालुक्यातील अनेक कामे अपूर्ण असल्याचा मुद्दा सदस्य उमेश पाटील यांनी उपस्थित केला होता. येथील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी पाटील यांनी केली होती. त्यावर बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी संपूर्ण जिल्ह्यासाठी विशेष धोरण ठरवू, असे सांगितले होते. आता लघुपाटबंधारे विभागाने नव्या कामांची निविदा काढताना आजवर जिल्हा परिषदेची ३ ते ५ कामे अपूर्ण ठेवणाºया तसेच निकृष्ट कामे करणाºया ठेकेदारांना निविदा भरण्यास मनाई केली आहे. -----------------काम विक्रीला आळा बसणार !नेत्याच्या वशिल्याने काम मिळवून ते ठेकेदारांना विक्री करण्याचे प्रकार सर्रास होतात. त्यामुळे अनेकदा ठेकेदाराकडून चांगले काम होत नाही. पाटबंधारे आणि बांधकाम विभागात असे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत करमाळा, पंढरपूर, माढा तालुक्यात अनेक बोगस कामे झाली आहेत. या ठेकेदारांनाही दूर ठेवण्याचा अधिकाºयांचा प्रयत्न आहे. ------------------३१ मार्चपर्यंत कामे न केल्यास ‘ब्लॅकलिस्ट’जलयुक्त शिवारच्या २०१६-१७ च्या आराखड्यातील कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असे राज्य शासनाने ७ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाधिकाºयांना आदेश दिले आहेत. हा निर्णय पूर्वी बांधकाम विभाग घ्यायचा. सोलापूर जिल्ह्यातही पावसामुळे अनेक कामे अपूर्ण असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक बोगस ठेकेदारांना कामे विक्रीत रस असल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत, मात्र शासनाच्या नव्या नियमामुळे अशा लोकांना चाप बसणार आहे. -------------एकाला २ ते ३ कामेच मिळणारमागच्या वेळेला अनेकदा कमी दरात निविदा भरूनही कामे अपूर्ण ठेवली आहेत. अशा लोकांमुळे निधी अडकून पडतो. अनेकदा क्षमता नसतानाही काहीजण चार, पाच कामांची निविदा मिळवितात. या लोकांना आळा घालण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या निविदा नियमावलीचे नियम कडक करण्यास सांगितले. स्थायी समितीच्या बैैठकीत सर्व सदस्यांनी त्यावर एकमत दाखवले.  त्यामुळे एकाला २ ते ३ कामेच मिळतील. क्षमता असेल तर जादा कामे करण्यास हरकत नाही, परंतु, आजवर असे झालेले नाही. बांधकाम १ आणि २ मध्येही आजवर कामे अपूर्ण ठेवणाºया ठेकेदारांना याच पद्धतीचा नियम लावला जाणार आहे. - विजयराज डोंगरे,  सभापती,अर्थ व  बांधकाम समिती, जिल्हा परिषद------------------------कामे ३ की ५ ? निर्णय अतिरिक्त मुख्याधिकाºयांकडे लघुपाटबंधारे विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बंधारे खोलीकरणाची ६७ तर सेस फंडातून कोल्हापूर पध्दतीची बंधारे दुरुस्ती व पडदी बांधकामांच्या ८३ कामांना मंजुरी दिली आहे. त्याची निविदा लवकरच जारी होत आहे. या कामांना प्रथमत: नवा नियम लावला जाणार आहे. यात कामचुकारांना ३ कामांचा की ५ कामांचा नियम लावायचा याबाबतचा निर्णय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे प्रलंबित आहे. जास्तीत जास्त ३ कामांचा नियम लावण्यात यावा यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. तीन कामांचा नियम लावल्यास चांगल्या ठेकेदारांनाच निविदा मिळेल. त्यातून चांगली कामे होतील, असे पदाधिकाºयांचे मत आहे.