शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नियम डावलून सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम; किसान आर्मीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 11:53 IST

जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी नियोजनाच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही प्रफुल्ल कदम यांनी केला आहे.

ठळक मुद्देकमी खर्चाचे योग्य पर्याय असताना जास्त खर्चाचे अत्यंत चुकीचे पर्याय निवडले आयआरसी व टाऊन प्लॅनिंग, पर्यावरण आदींचा विचार करण्यात आलेला नाही

सोलापूर: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची कोट्यवधी रुपयांची कामे शासकीय नियम, अटी व नियोजन सर्व निकष पायदळी तुडवून केली जात आहेत. यात काही लोकांच्या स्वार्थाला प्राधान्य दिले जात आहे. सांगोला बाह्यवळण मार्गासह जिल्ह्यातील सर्व कामांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी केली आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी नियोजनाच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे. 

कदम म्हणाले की, कमी खर्चाचे योग्य पर्याय असताना जास्त खर्चाचे अत्यंत चुकीचे पर्याय निवडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ आयआरसी व टाऊन प्लॅनिंग, पर्यावरण आदींचा विचार करण्यात आलेला नाही. सांगोला बाह्यवळण मार्गाबाबतची ३ (अ) अधिसूचना प्रसिद्धीकरण ४ मार्च २०१८ रोजी झाले आहे. थ्रीडी प्रसिद्धीकरण भारत सरकारच्या गॅझेटमध्ये १८ जून २०१८ रोजी झाले. तथापि या कामाची ९५७ कोटी रुपयांची टेंडर नोटीस १२ आॅक्टोबर २०१७ रोजी देण्यात आली. या कामाचा कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदाराला २३ मार्च २०१८ रोजी देण्यात आला. अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी, थ्रीडी होण्यापूर्वी आणि उपविभागीय अधिकाºयांकडे रितसर सुनावणी होण्यापूर्वीच ठेकेदाराला ठेका दिला आहे.

आमचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला विरोध नाही. जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. नियमानुसार सर्व कामे झाली पाहिजेत. शासनाला अंधारात ठेवून कामकाज केले जात आहे. या विरोधात कमलापूर (ता. सांगोला) येथे मंगळवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. रास्ता रोको आंदोलन होणार आहे. - प्रफुल्ल कदम, किसान व वॉटर आर्मी. 

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक