जनतेचे रक्षण करणारे शहर पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी असुरक्षित असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास मिळाला.
महिला पोलीस अधिकार्याचे लाखाचे दागिने पळविले
सोलापूर : जनतेचे रक्षण करणारे शहर पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी असुरक्षित असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास मिळाला. महिला पोलीस अधिकारी संगीता हत्ती यांच्या गाडीच्या डिकीमधून १ लाख ८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व १३ हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलीस अधिकारी संगीता हत्ती व त्यांची बहीण या दोघी मित्र विलास पाटील यांच्या टीव्हीएस वेगो (एमएच १३ बीएस 0६0 ) यावरून एम्प्लॉयमेंट चौकाकडे जात होत्या. या दोघी हॉटेल कामत येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्या असता हॉटेल कामतच्या पाठीमागील पार्किंगमध्ये टीव्हीएस गाडी पार्क केली होती. त्यानंतर त्या दोघी हॉटेल कामतमध्ये जाऊन बसल्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डिकीतील १ लाख ८ हजारांचे दागिने व रोख रक्कम १३ हजार एवढा ऐवज चोरून नेला. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ कांबळे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
Web Title: Women's police officers used to loot lakhs of jewelery