शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

महिलांचे आरोग्य अन् पर्यावरण...!

By appasaheb.patil | Updated: May 15, 2019 10:59 IST

अतिशय नाजूक असा हा विषय आहे. कारण की या विषयावर अजूनही बºयाच ठिकाणी बोलता येत नाही किंवा साधी चर्चाही ...

अतिशय नाजूक असा हा विषय आहे. कारण की या विषयावर अजूनही बºयाच ठिकाणी बोलता येत नाही किंवा साधी चर्चाही होत नाही. तर मासिक पाळी ज्याला सगळे जण पीरिअड्स किंवा एम. सी. (मेन्स्ट्रुअल सायकल) म्हणतात ना, हा विषय काही लोकांच्या बाबतीत खूप खासगी असतो, तसेच काहीच लोक या विषयावर अगदी उघडपणे चर्चा करत असतात. काही लोकांच्या मते ही देवाने स्त्रीला दिलेली एक देणगी आहे़ नवीन युगाची नवीन स्त्री शिकण्याबरोबरच सर्वच बाबतीत पुढे जात आहेत. घर, काम, संसार सांभाळून स्वत:चीही काळजी अगदी व्यवस्थितपणे ती घेत आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रीच्या अनेक समस्या आहेत़ मासिक पाळी हा विषय जिव्हाळ्याचा असूनही त्याची वाच्यता फारशी होत नाही़ याचे कारण म्हणजे अज्ञान आणि संकुचित वृत्ती़ मासिक पाळीबद्दल असलेल्या समज-गैरसमजामुळे त्याच्या उपायांबद्दलही बºयाचदा चर्चा होताना दिसत नाही. सॅनिटरी पॅड वापरावयास जरी सोपे असले तरी पर्यावरणास अतिशय घातक सिद्ध होत असल्याचे सांगण्यात आले आहे़ माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये सॅनिटरी पॅडचा कचरा उग्र स्वरूप धारण करू लागला आहे.

२०११ च्या आकड्यांनुसार भारतात ९ हजार टन इतका कचरा दर महिन्याला जमा होत आहे. रक्तस्रावाने माखलेल्या सॅनिटरी पॅडचा यात प्रामुख्याने समावेश असतो. हा कचरा उघड्यावर हाताळल्याने असंख्य हानिकारक जीवजंतूंचा संसर्ग या लोकांना होतो़ स्त्रीच्या मासिक पाळीत वापरले जाणारे पॅड बनविताना वापरल्या जाणाºया पदार्थांमध्ये कागद आणि लाकडाच्या लगद्याचा उपयोग केला जातो. तो स्वच्छ करताना ब्लिचिंगच्या प्रक्रियेमुळे तयार होणारे डायॉक्सिन तसेच लिकेजप्रूफ करण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरामुळे त्याचे विघटन होत नाही व तो जाळल्यास विषारी वायू उत्पन्न होतो, न जाळल्यास ५०० वर्षे तसाच पडून राहिल्याने पर्यावरणास धोका उद्भवतो़ सॅनिटरी पॅडमुळे स्त्रीला विविध रोगांना सामना करावा लागतो़ ज्यात प्रामुख्याने त्वचेचे आजार, गर्भाशयाचे आजार व कर्करोगसुद्धा संभवतो. अनेक स्त्रिया एक पॅड जास्तीत जास्त ६ तास वापरू शकते.

एका स्त्रीला महिन्यात १० पॅड याप्रमाणे आयुष्यात ४ हजार ५०० पॅड लागतात. याची विल्हेवाट लावणे अत्यंत कठीण काम आहे़ एकीकडे स्त्रियांचे गंभीर आजार तर दुसरीकडे पर्यावरणाला होणारा धोका याला पर्यायी व्यवस्था म्हणून कापडी पुन्हा वापरण्याजोगे कापडी पॅड अथवा मासिक कपचा वापर ही संकल्पना आता रुजू होऊ पाहत आहे़ हा मासिक कप मेडिकल ग्रेड सिलीकॉनचा बनविलेला असतो़ जो वापरण्यास सोपा आणि पुन:पुन्हा १० वर्षे वापरता येतो. यामुळे कुठल्याही प्रकारे त्रास न होता पर्यावरण राखण्यास मदतच होते़ स्त्रियांना होणाºया मासिक पाळीच्या त्रासापासून मुक्तता व पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल, अशा पद्धतीचा वापर करणे शहाणपणाचे होईल, यात शंका नाही.- नितीन महाजन,(लेखक हे आरोग्यविषयक अभ्यासक आहेत़)

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाHealthआरोग्य