शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
3
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
4
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
5
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
6
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
7
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
8
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
9
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
10
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
11
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
12
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
13
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
14
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
15
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
16
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
17
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
18
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
19
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
20
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?

Women's Day Special :दोनशे किलोची बुलेट लिलया पेलून स्वार होतात सोलापूरच्या युवती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 10:52 IST

यशवंत सादूल  सोलापूर : ‘जब बुलेट चले रस्ते पर, तो दुनिया रास्ता दे’... या उक्तीप्रमाणे प्रत्येक भारतीयाचे आकर्षण असलेली ...

ठळक मुद्देदोनशे किलोपर्यंत वजन असलेली ही गाडी चालविण्यासाठी तशी धष्टपुष्ट शरीरयष्टी असावी लागतेभारतीय जनमानसाचा विचार करून कंपनीने १९९४ मध्ये त्यामध्ये काही तांत्रिक बदल करून सर्वांना चालविण्याजोगे सोपे केले

यशवंत सादूल 

सोलापूर : ‘जब बुलेट चले रस्ते पर, तो दुनिया रास्ता दे’... या उक्तीप्रमाणे प्रत्येक भारतीयाचे आकर्षण असलेली ही मोटरसायकल आयुष्यात एकदा तरी चालवावी, असे स्वप्न प्रत्यकाचे असते.

दोनशे किलोपर्यंत वजन असलेली ही गाडी चालविण्यासाठी तशी धष्टपुष्ट शरीरयष्टी असावी लागते, पण भारतीय जनमानसाचा विचार करून कंपनीने १९९४ मध्ये त्यामध्ये काही तांत्रिक बदल करून सर्वांना चालविण्याजोगे सोपे केले. त्यामुळे युवतींमध्येही बुलेटचे आकर्षण वाढत गेले. पुरुषांच्या बरोबरीने आपणही वजनाने जड असलेली ही गाडी चालवू शकतो, हे सरावाने सिद्ध केले ते सोलापुरातील लेडी सावरीन रायडर ग्रुप व शिवसम्राज्ञी प्रतिष्ठानच्या १५ ते २० युवतींनी. महिला दिनानिमित्त घेतलेला हा परामर्श.

शेतकºयांपासून ते सैनिक, पोलीस अधिकारी, राजकारणी अशा सर्व स्तरातील लोकांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसते ते या राजेशाही गाडीमुळे. ‘रंगदार, थानेदार, बागाईतदार’ तीन दारात तर याचे मोठे आकर्षण अन् प्रतिष्ठाही. महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यांची बौद्धिक क्षमता अफाट असून, ती वेळोवेळी ते सिद्ध करूनही दाखवत आहेत. कुस्ती, मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग अशा शारीरिक कष्टाच्या खेळातूनही नैपुण्य मिळवत आहेत. सोलापुरातील वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करणाºया दिव्या कदम, अस्मिता पवार, मंजुश्री सासवे, गौतमी राजूल, ऋतु भोसले, त्रिवेणी मोगल, पूजा चव्हाण अशा मेकॅनिक, संगणकीय, अभियांत्रिकी उच्च शिक्षित युवतींनी अवजड अशी बुलेट चालविण्याचा छंद जोपासला आहे. या गाडीवर स्वार होत भारतभर भटकंती करण्याची इच्छा आहे.

सैराटनंतर बुलेटचे आकर्षण युवतींमध्ये वाढले असले तरी मागील आठ ते दहा वर्षांपासून या युवतींनी वाहन चालविण्यासोबत बुलेट रायडर्स ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपमार्फत शहरालगतचे पीकनिक स्पॉट, जवळपास असलेल्या तुळजापूर, रामलिंग, अक्कलकोट, उजनी धरण या ठिकाणी राईड करतात.

अशी आहे बुलेट ...- १९५२ पासून संपूर्णत: भारतीय बनावटीची असलेली ही मोटरसायकल सर्वांत जास्त वजनाची आहे. त्याची लांबी पाच ते सहा फूट आहे. ३५० ते ६५० सीसी इंजिन क्षमतेच्या गाड्या उपलब्ध आहेत़ महिलांना थंडर बर्डसारख्या मॉडेलचे आकर्षण असून, त्या सहज चालवू शकतील अशी रचना आहे, असे पवन मोंढे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day 2018महिला दिन २०१८Womenमहिला