शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Women's Day Special : छेड काढणाºया रोडरोमिओंना सोलापूर शहर पोलीस दलातील ‘दामिनींचा धाक’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:05 IST

संताजी शिंदे  सोलापूर : कुठेही छेडछाड होत असेल, असुरक्षितता जाणवत असेल तर अशा ठिकाणी मुली व महिलांना निर्भयपणे वावरता ...

ठळक मुद्देशाळा-कॉलेजमध्ये जाऊन मुलींचे कायदेशीर सल्ला देवुन समुपदेशन व जनजागृती करण्याचे काम दामिनी पथकाकडून केले जात आहेटोल फ्री नंबरवरून फोन केल्यास दामिनी पथक किंवा संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे तत्काळ त्या ठिकाणी जातात

संताजी शिंदे 

सोलापूर : कुठेही छेडछाड होत असेल, असुरक्षितता जाणवत असेल तर अशा ठिकाणी मुली व महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी शहरात मोटरसायकलवरून दामिनी पथक गस्त घालत आहे. या प्रकारामुळे रोडरोमिओला चाप बसला असून, महिलांना दिलासा मिळत आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाऊन मुलींचे कायदेशीर सल्ला देवुन समुपदेशन व जनजागृती करण्याचे काम दामिनी पथकाकडून केले जात आहे. 

घराच्या बाहेर पडणारी मुलगी असो किंवा महिला जागोजागी रोडरोमिओंचा वाईट अनुभव येत असतो. बहुतांश मुली या प्रकारामुळे शाळेला किंवा कॉलेजला जाण्यास घाबरतात. बाहेर होणारा त्रास घरच्यांना सांगितला की शिक्षण बंद होईल, या भीतीपोटी हा त्रास निमूटपणे सहन करतात. अशा परिस्थितीत मुलींना व महिलांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील रणरागिण्या सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान शहरातील विविध भागांत गस्त घालत असतात. मुलींना छेड काढण्याच्या उद्देशाने थांबलेल्या रोडरोमिओंना हटकतात, तेथून निघून जाण्यास सांगतात. काही ठिकाणी जर बिकट प्रसंग उद्भवत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांशी संपर्क साधून अधिकचा पोलीस बंदोबस्त मागवून घेतात.

दररोज मुलींच्या शाळा व कॉलेजमध्ये दामिनी पथकाची भेट असते. मुख्याध्यापक, प्राचार्य यांची भेट घेऊन चौकशी केली जाते. हजेरी बुकावर सही करून दामिनी पुढील कामाला निघते. मुलींना काही त्रास आहे का? असल्यास गुपचूप आम्हाला सांगा आम्ही बंदोबस्त करतो, असे आवाहन मुलींना करतात. शहरात कोठेही महिला असुरक्षित असेल तर त्यांच्यासाठी १०९८, १९१ किंवा १०० नंबरवर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टोल फ्री नंबरवरून फोन केल्यास दामिनी पथक किंवा संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे तत्काळ त्या ठिकाणी जातात.

पोलीस ठाणेनिहाय दामिनी पथक...- फौजदार चावडी पोलीस ठाणे- भाग्यश्री गुंड, रत्ना सोनवणे, जेलरोड- अर्चना जमादार, एमआयडीसी- संगीता डोळस, जोडभावी पेठ- रूपा माशाळ, गंगा खोबरे, सदर बझार- शरावती सलगर वस्ती- ज्योती शेरखाने, निलाबाई इमडे, औद्योगिक पोलीस चौकी- भाग्यश्री केदार, आयटीआय पोलीस चौकी- अंजली दहिहांडे, मीनाक्षी नारंगकर. फौजदार हर्षा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक शहरात गस्त घालत असते. 

सहन करू नका, पोलिसांना माहिती द्या : अभय डोंगरे- शहरातील मुली, महिला सुरक्षित राहाव्यात, छेडछाडीला आळा बसावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शासनाच्या वतीने दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. हे दामिनी पथक दिवसभर शहरात फिरतीवर असते, या पथकावर थेट आयुक्तालयाच्या कंट्रोल विभागातून नियंत्रण असते. महिलांनी निर्भय राहून घराच्या बाहेर पडले पाहिजे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसWomen's Day Specialजागतिक महिला दिनWomen's Day 2018महिला दिन २०१८