पतीपासून वेगळे राहणाऱ्या महिलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST2021-05-09T04:22:59+5:302021-05-09T04:22:59+5:30

बार्शी : पतीला दारूचे व्यसन असल्याने सासरी सतत होणाऱ्या मारहाणीमुळे पाच महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेलेली ...

Women living apart from their husbands | पतीपासून वेगळे राहणाऱ्या महिलेस

पतीपासून वेगळे राहणाऱ्या महिलेस

बार्शी : पतीला दारूचे व्यसन असल्याने सासरी सतत होणाऱ्या मारहाणीमुळे पाच महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेलेली व धुणीभांडी करून जगत असलेली महिला शगुप्ता कलीम पठाण हिला शिवीगाळ करून बेल्टने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी चार महिलांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. शुक्रवारी ही घटना घडली. याप्रकरणी जखमी महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी नणंद रोशन शेख (रा. सोलापूर रोड),मावस सासू अमिना शेख (रा. फुले प्लॉट), मुमताज शेख (रा. नाळे प्लॉट व नणंदेची मैत्रीण भाग्यश्री नलवडे (रा. मल्लिकार्जुन मंदिर) यांच्याविरुद्ध भादंवि ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती महिला पती मुलासह सोलापूर रोडवर राहत असून, पती दारू पिऊन सतत मारहाण करत होता त्यामुळे ती एकटीच पाच महिन्यांपूर्वी भाड्याच्या घरात रहात होती. धुणीभांडी करून जगत होती. घटनेच्या दिवशी या महिलांनी येऊन ‘तुझ्यामुळे माझा भाऊ व्यसनाधीन झाला. तुझी मुले कोण सांभाळणार. तू आताच्या आता घरी चल’ असे म्हणताच तिने ‘पतीसोबत राहायचे नाही’ असे म्हणताच शिवीगाळ करून बेल्टने डोक्यावर, हातावर मारहाण केली. आरडाओरड करताच पळून गेल्या.

----

Web Title: Women living apart from their husbands